Dance-Bar
Dance-Bar 
मुंबई

बारमधील उधळपट्टीवर ‘सत्कर्म’चा तोडगा

सकाळवृत्तसेवा

मुंबई - नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताडदेवच्या इंडियाना बारमधील ग्राहक व कर्मचाऱ्यांना कोठडीत रात्र घालवायची नसेल, तर त्यांनी बदलापूरच्या सत्कर्म बालकाश्रमाला प्रत्येकी तीन हजार रुपये देणगी द्यावी, असा आगळावेगळा आदेश न्यायदंडाधिकारी सबिना मलीक यांनी रविवारी दिला. 

मुंबई पोलिसांनी या बारवर केलेल्या कारवाईमुळे सत्कर्म बालकाश्रमाला एक लाख ४१ हजार रुपये मिळतील. पोलिसांनी येथून अटक केलेल्या ४७ ग्राहक व कर्मचाऱ्यांना जामीन हवा असेल, तर त्यांना या बालकाश्रमाला प्रत्येकी तीन हजार रुपये देणगी द्यावी लागेल, असा आदेश दंडाधिकारी सबिना मलीक यांनी रविवारी दिले. 

यापूर्वी किरकोळ गुन्ह्यांमधील आरोपींनी अशी समाजसेवी संस्थांना देणगी द्यावी किंवा आरोपीने समाजसेवा करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, बारमधील ग्राहक व कर्मचाऱ्यांना अशी समाजसेवी देणगी देणे भाग पाडणारा हा पहिलाच आदेश असल्याचे बोलले जाते. 

पोलिसांनी येथे ४७ ग्राहक व कर्मचाऱ्यांना अटक केली होती. सामान्यतः अशा प्रकरणांमध्ये अटक झाल्यानंतर आरोपींना बेल बॉन्डवर मुक्त केले जाते; पण इंडियाना बारमधील कारवाईत अटक केलेल्या ४७ आरोपींना एक दिवस तरी कोठडीत का पाठवू नये, त्यामुळे आरोपींनी केलेले कृत्य त्यांच्या कुटुंबीयांना कळेल, असा प्रश्‍न सुटीच्या न्यायालयातील दंडाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. तर आरोपींना पहिल्यांदाच अशा प्रकारच्या गुन्ह्यात अटक झाल्यामुळे त्यांना जामीन देण्याची मागणी आठ आरोपींची बाजू मांडणारे वकील कमलेश मोरे यांनी केली. 

रकमेचा सदुपयोग
बेलबॉन्डच्या रकमेचा सदुपयोग कसा करता येईल, याबाबतीत बचाव पक्ष व दंडाधिकारी यांच्यात बोलणे सुरू होते. नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंड, क्राय, अपनालय, वर्ल्ड व्हिजन अशा स्वयंसेवी संस्थांना देणगी देता येऊ शकेल, असे काही वकिलांनी सुचवले. शेवटी बदलापूर येथील सत्कर्म बालकाश्रमाचे नाव दंडाधिकाऱ्यांनी निश्‍चित केले आणि प्रत्येक आरोपीला पोलिसांकडे तीन हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. ती रक्कम पोलिसांनी या बालकाश्रमाला देऊन एक लाख ४१ हजारांची पावती न्यायालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईत बारचा व्यवस्थापक, कर्मचारी व ग्राहकांना अशा ४७ जणांना अटक केली होती. बहुतांश ग्राहक हे मुंबईतील रहिवासी असून, कर्मचाऱ्यांमधील काही जण गुजरात व मध्य प्रदेशातील रहिवासी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT