Eknath Shinde Uddhav Thackeray  Sakal
मुंबई

Dasara Melava Shivsena: ठरलं? शिंदे गटाचा अर्ज BMC ने स्विकारला तर शिवसेनेचा फेटाळला!

दोन्ही गटांमध्ये दसरा मेळाव्यासाठी चढाओढ सुरू आहे. पण हा संघर्ष आता शेवटाकडे येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली समर्थक आमदारांचा गट तयार झाला. हा गट आता शिवसेनेवर दावा सांगू लागला आहे. अशातच शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा कोण घेणार यावर वाद सुरू झाला. दोन्ही गटांमध्ये या दसरा मेळाव्यासाठी चढाओढ सुरू होती. पण आता हा संघर्ष शेवटाकडे आलाय, अशी चिन्हं दिसू लागली आहेत.

शिवसेना आणि शिंदे गट दोघांनीही दसरा मेळाव्यासाठी दादरचं शिवाजी पार्क हे मैदान मिळावं यासाठी अर्ज केला होता. मात्र अद्याप मुंबई महानगरपालिकेने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशातच आता शिंदे गटाने वांद्रे कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीए मैदानासाठी केलेला अर्ज महापालिकेने स्विकारला आहे. तर शिवसेनेचा बीकेसीतल्या मैदानाचा अर्ज हे मैदान आरक्षित असल्याने फेटाळला आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून दादर इथल्या शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेतला जातो. मात्र यंदाच्या बंडाचा फटका बसल्याने अद्याप दसरा मेळाव्याबद्दल काहीही निर्णय झालेला नाही. शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन हे मैदान कोणाला मिळणार याबद्दल कोणताही निर्णय महापालिकेने दिलेला नाही. त्यामुळे आता दसरा मेळाव्याचं काय होणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर फडणवीसांचा मोठा संकेत; ‘चर्चेची दारे खुली, कायदेशीर चौकटीत तोडगा काढू’

Panchganga River Incident : रक्षाबंधनाची राखी हातात अन्... बहिणीच्या डोळ्यांदेखतच भावाने पंचगंगा नदीत मारली उडी; रुई पुलावर थरार

NASA Roman: हबलपेक्षा तब्बल 1000 पट वेगवान! नासाची रोमन दुर्बीण अवकाशात; विश्वाच्या गूढ रहस्यांचा घेणार वेध

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज; 'या' तीन जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

SCROLL FOR NEXT