arrest 
मुंबई

धक्कादायक ! शुल्लक कारणावरुन नालासोपाऱ्यात अंध व्यक्तीची हत्या; गुन्हेगार अटकेत

विजय गायकवाड : सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : घरासमोर उभे राहून गोंधळ करणाऱ्यांना शांत राहण्यास सांगितल्याच्या रागातून नालासोपाऱ्यात अंध व्यक्तीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्‍या आवळण्यात तुलिंज पोलिसांना यश आले आहे. यात दोन जणांना अटक केले असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुकेश सुलपतबहार असे हत्या झालेल्या अंध व्यक्तीचे नाव आहे. तर उमेश प्रकाश जोशी (वय 26) आणि प्रदीप शांताराम पानकर (वय 29) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहेत. उमेश जोशी हा नालासोपारा मोरगाव तर प्रदीप हा विरार पूर्व कारगिल नगरचा रहिवाशी आहे. 28 जुलै रोजी नालासोपारा पूर्व मोरगाव जिजाईनगर जेसीका चाळ येथे राहणारा मयत मुकेश सुलपटबहार यांच्या घरासमोर दारू पिऊन गोंधळ घालत होते.

यावेळी मुकेश आणि त्यांची पत्नी ललिता यांनी या दोघांना गोंधळ घालू नका असे सांगितले. एवढ्याच किरकोळ कारणावरून या दोघांनी या दांपत्याला लाथाबुक्‍यांनी मारहाण करून त्यांच्यावर ब्लेडने वार केले. यात अंध मुकेश गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा दोन दिवसाने मृत्यू झाला होता. तुलिंजचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी वरिष्ठच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेची टीम तपासासाठी पाठवून आठ दिवसांच्या आत या गुन्ह्याचा उकल करण्यात यश मिळविले. अटकेतील दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे तापासाधिकाऱ्यांनी सांगितले. 

(संपादन : वैभव गाटे)

death of blind man in nalasopara read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनानिमित्त महापौरांच्या मुंबईकरांना शुभेच्छा

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT