decision of vanchit prakash ambedkar fight independently is right says Union Minister Ramdas Athawale Sakal
मुंबई

Dombivli : वंचितचा स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्यच; केंद्रीय मंत्री रामदास आठवले

वंचितने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आपले उमेदवार उभे केले. प्रकाश आंबेडकर यांनी हा योग्य निर्णय घेतला. त्याची इच्छा महाविकास आघाडीत सामिल व्हायची होती. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली- वंचितने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आपले उमेदवार उभे केले. प्रकाश आंबेडकर यांनी हा योग्य निर्णय घेतला. त्याची इच्छा महाविकास आघाडीत सामिल व्हायची होती. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

त्यामुळे स्वबळावर लढण्याचा जो निर्णय आहॆ तो योग्यच आहॆ, दुसरा इलाज अजिबात नाही. महाविकास आघाडीला लुटा लूट करता आली नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीला टोला देखील लगावला आहे.

डोंबिवलीत राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यानी पत्रकाराशी संवाद साधताना वंचितचा जो निर्णय आहे तो योग्य निर्णय आहे असे सांगितले.

वंचित ने मल्लिकार्जुन यांना पत्र लिहिलं होतं, त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यांनी त्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा योग्य निर्णय आहे.

महाविकास आघाडीला लुटालूट करता आली नाही तर ते काय महाविकास करणार आहेत. दहा वर्षांमध्ये आपल्याला जो बदल आहे तो जाणवत आहे आणि अनेक ठिकाणी बदल आपल्याला पाहायला मिळत आहे.त्यामुळे देशासमोर दुसरा पर्याय नाही मोदी हेच एकमेव पर्याय आहेत असे ते म्हणाले.

आठवले यांनी कविते पासून सुरवात केली...

"माझ्या नावामध्ये जरी असला राम तरी माझ आहे बौद्ध धर्माच काम" असे कविता म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सुरवात केली. ते म्हणाले, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. सर्वधर्मसमभावाची भूमिका आमची आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका पुढे चालवायची असेल तर अखंड भारताची भूमिका पुढे चालू ठेवली पाहिजे. या ठिकाणी दुसरी बौद्ध धम्म परिषद झालेली आहे बौद्ध धर्म हा मनाला शांततेच्या दृष्टीने नेणारा धर्म आहे. आगळी वेगळी परिषद आज येथे झाली आहे.

बच्चूकडू नाराजी...

बच्चूकडू आणि राणा दाम्पत्य यांचा वाद जुनाच आहॆ. त्याची नाराजी आणि विषय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मिटवावा, मी त्यांच्याशी बोलेल, बच्चू कडू यांची नाराजी मिटवाण्याच्या प्रयत्न करेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT