Maratha Reservation 
मुंबई

Maratha Reservation: मराठा आंदोलनाचा आज निर्णायक दिवस! मुख्यमंत्री स्वत: जरांगेंना भेटून तोडगा काढणार?

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील आज हजारो मराठ्यांसह वाशीमध्ये थांबले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटलं असून महत्त्वाची चर्चा सुरु आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- मनोज जरांगे पाटील आज हजारो मराठ्यांसह वाशीमध्ये थांबले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटलं असून महत्त्वाची चर्चा सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी वाशीमध्ये येण्याची शक्यता आहे. ( decisive day of the Maratha reservation andolan cm eknath shinde meet manoj Jarange Patil)

गुरुवारी मनोज जरांगे म्हणाले होते की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी भेटीसाठी यावं आणि चर्चा करावी. यानंतर मुख्यमंत्री वाशीमध्ये येऊन जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे आज या मुद्द्यावरुन तोडगा काढू शकतात. तसेच सुधारित जीआर देखील जरांगे यांना देण्यात येऊ शकतो. माहितीनुसार, जीआरमध्ये आईकडचे नातेवाईक यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, असा उल्लेख आहे.

मनोज जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. सरकार जरांगेंच्या मागण्यांची पूर्तता करण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे ते पुढचा काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे. ते मुंबईकडे कुच करतील का? हे लवकरच स्पष्ट होईल.

मनोज जरांगे पाटील २० जानेवारी रोजी आंतरवली सराटी येथून मुंबईकडे रवाना झाले. गुरुवारी रात्री त्यांचा ताफा लोणावळ्यात आला होता. मुंबईकडे कूच करत असताना त्यांनी खारघर येथील मैदानातच थांबावे अशी विनंती त्यांना नवी मुंबई पोलिसांनी केली होती. मुंबईमध्ये जरांगे पाटील आल्यास जनजीवन विस्कळीत होऊ शकते असा दावा पोलिसांना केलाय. मात्र, आज तोडगा निघाला नाही तर जरांगे पाटील आझाद मैदानात येण्यावर ठाम आहेत. (Latest Marathi News)

आझाद मैदानावर उपोषण करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, आझाद मैदानावर मराठा आयोजकांकडून तयारी सुरु झाली आहे. स्टेजचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आज काय घडामोडी घडतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

Neena Kulkarni : अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार; अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनातील योगदानाबद्दल सन्मान

Latest Marathi News Live Update : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

Pune Crime : झोमॅटो डिलीव्हरी बॉयला मारहाण, तीन आरोपी ताब्यात

Satara Crime : 'ती' गरोदर आहे, कुणाला कळलं तर? काकाने अल्पवयीन मुलीचा गळा आवळून केला खून; मृतदेह पुरला कोयना धरणाच्या किनारी

SCROLL FOR NEXT