mumbai Double-Decker bus sakal
मुंबई

Mumbai News : डबलडेकर बसेसचा पुरवठ्यास विलंब; पुरवठादार कंपनीला कारणे दाखवा नोटीस

पहिल्या टप्प्यात २०० बसेस पैकी १२ बसेसचा पुरवठा स्विच मोबॅलिटी कंपनीकडून करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - स्विच मोबॅलिटी व कॉसिस मोबॅलिटी कंपनी या दोन कंपन्यांकडून एकूण ९०० वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर बसेस सेवेत आणल्या जाणार आहेत. स्विच मोबॅलिटी कंपनीकडून एकूण २०० बसेसचा पुरवठा होणार असून सद्या १२ बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे.

मात्र कॉसिस मोबॅलिटी कंपनीकडून अद्याप एकही डबलडेकर बसचा पुरवठा न झाल्याने या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.डबल डेकर बसेस मुंबईची शान असून सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात १९ डबल डेकर बसेस आहेत.

मात्र या बसेसची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने नवीन ९०० वातानुकूलित डबल डेकर बसेस समाविष्ट करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात २०० बसेस पैकी १२ बसेसचा पुरवठा स्विच मोबॅलिटी कंपनीकडून करण्यात आला असून उर्वरित बसेस टप्याटप्याने करण्यात येत आहे.

तर ७०० बसेस कॉसिस मोबॅलिटी कंपनीकडून करण्यात येणार आहे. मात्र वर्ष उलटून गेले तरी बसेसचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे कॉसिस मोबॅलिटी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्यात उशीर झाला असून कंपनीवर कारवाई का करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे उपक्रमातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील वातानुकूलित इलेक्ट्रीक बसेस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात १९ डबलडेकर बसेस असून त्या १५ वर्षें जुन्या झाल्या आहेत. वयोमर्यादा संपल्याने नियमानुसार या बसेस टप्याटप्याने भंगारात काढल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT