A Delhi to Goa flight made an emergency landing at Mumbai Airport due to a mid-air technical issue; all passengers are reported safe.  esakal
मुंबई

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

Delhi to Goa flight emergency emergency landing at Mumbai : जाणून घ्या, नेमकं कोणत्या कारणामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं?

Mayur Ratnaparkhe

Flight from Delhi to Goa Makes Emergency Landing in Mumbai : दिल्ली ते गोवा विमानाची मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली आहे. इंडिगो कंपनीच्या या विमानाच्या एका इंजिनात बिघाड झाल्याने ही इमर्जन्सी लँडिंग करावी लागल्याचे समोर आले आहे. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

प्राप्त माहितीनुसार, या विमानाच्या लँडिंगची वेळ रात्री ९:४२ वाजता होती. एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पायलटने रात्री ९:२५ वाजता अलार्म वाजवला होता. यानंतर मग विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. सुदैवाने पायलटच्या वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

विमानात एकूण किती प्रवासी होते, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे समजले आहे. तसेच प्राप्त माहितीनुसार रात्री आठ वाजता या विमानाने दिल्लीहून गोव्याकडे उड्डाण घेतले होते. मात्र मध्येच बिघाड उद्बभवल्याने विमान मुंबईकडे वळवले गेले.

दरम्यान  ‘‘गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताबाबत विमान अपघात तपास विभागाच्या (एएआयबी) प्राथमिक अहवालात विमान किंवा इंजिनामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड किंवा देखभालीशी संबंधित समस्या आढळून आलेली नाही. सर्व अनिवार्य देखभालीचे कामही पूर्ण झाले होते,’’ असे ‘एअर इंडिया’चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी म्हटले आहे. १२ जून रोजी झालेल्या दुर्घटनेत २६० लोकांचा मृत्यू झाल्यानंतर विविध स्तरांवर अपघाताच्या कारणांबाबत तर्कवितर्क केले जात होते. त्या पार्श्वभूमीवर ‘एअर इंडिया’चे सीईओ बोलत होते.

‘फ्युएल स्वीच’च्या तपासणीचे आदेश

याशिवाय, पुढील आठवडाभराच्या कालावधीत सर्व विमानांच्या इंजिनांच्या फ्युएल स्वीचची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) सर्व कंपन्यांना दिले आहेत. गुजरातमध्ये ‘एअर इंडिया’ कंपनीच्या विमानास झालेल्या अपघाताला दोन्ही इंजिनांचे बंद झालेले फ्युएल स्वीच कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आल्यामुळे सर्व कंपन्यांना हा आदेश देण्यात आला आहे. सर्व नोंदणीकृत विमानांनी इंजिनांच्या फ्युएल स्वीचची २१ जुलैपर्यंत तपासणी करणे अनिवार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: अंबादास दानवेंनंतर कोण? विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी 'हे' नाव फायनल?

Cyclist Died during Tour: दुर्दैवी! शर्यतीदरम्यानच १९ वर्षांच्या सायकलपटूचा अपघातात मृत्यू; नेमकं काय झालं, जाणून घ्या

Nagpur Crime : पत्नीस पोटगी देण्यासाठी झाला सोनसाखळी चोर

Virar News : उत्तर भारतीयांची मते कोणाला? यावर वसई विरारमध्ये घडताहेत चर्चा

Nurse Strike: राज्यातील परिचारिकांचा संप, मागण्या मान्य न झाल्यास 'या' तारखेपासून राज्यव्यापी निषेधाची घोषणा, आरोग्य सेवा ठप्प होणार?

SCROLL FOR NEXT