Devendra Fadnavis on Ajit Pawar
Devendra Fadnavis on Ajit Pawar sakal
मुंबई

Devendra Fadnavis : त्यांच्या पक्षासारखे स्वार्थी नेते आमच्याकडे नाहीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पवारांना उत्तर

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Devendra Fadnavis on Ajit Pawar : पुणे पोटनिवडणूक प्रचारा दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपाला लक्ष केले होते. आजारी असलेल्या आमदारांना मतदानासाठी विमानाने नेले जाते हा भाजपाचा स्वार्थ आहे असे म्हणत अजित पवारांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला होता.

याला भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देऊ केले आहे. त्यांना काय प्रॉब्लेम आहे ? असे म्हणत फडणवीस म्हणाले, आपला जीव दावावर लावून पक्षाकरीता मतदान करायला येतात त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या पक्षासारखे केवळ स्वार्थी नेते आमच्याकडे नाहीत असे म्हणत पवारांना टोलाही लगावला आहे.

पुणे पोटनिवडणूक प्रचारा दरम्यान चिंचवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा झाली होती.

या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. लक्ष्मण जगताप यांना भाजपाने आपल्या स्वार्थासाठी मतदान करण्यासाठी विमानाने नेले.

त्यामुळेच त्यांची दगदग झाली. त्यांच्या प्रकृतीचा विचार करता त्यांना न्यायला नको होते. असे म्हणज सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्षाने हल्लाबोल केला होता. याला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी डोंबिवलीत उत्तर दिले आहे.

ब्राह्मण समाजाच्या एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस हे डोंबिवलीत आले होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी विरोधी पक्षनेते पवार यांनी घेतलेल्या समाचारावर खरपूस टिका केली.

ते म्हणाले. त्यांना काय प्रॉब्लेम आहे? आमच्याकडे असे आमचे नेते आहेत की, जे पक्षाकरिता स्वतःचा जीव दावावर लावून त्या ठिकाणी मतदान करायला येतात. त्यांचा आम्हाला गौरव आहे. त्यांच्या पक्षासारखे केवळ स्वार्थी नेते आमच्याकडे नाहीत,

असे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाच्या एका कार्यक्रमला डोंबिवलीत आले होते, यावेळी प्रसिद्ध कलाकार प्रशांत दामले, आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार आयलानी, जिल्हाधिकारी, आयुक्त यांसह अनेक उद्योजक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT