Baba Siddique Murder Case Esakal
मुंबई

Baba Siddique: "चला दसरा साजरा करुया..." बाबा सिद्दीकींच्या हत्येत 4 नव्हे तर 10-15 जणांचा सहभाग? गोळीबारापूर्वी नेमकं काय घडलं?

What Happened At Baba Siddique Murder Spot: लॉरेन्स बिश्नोई टोळीने जारी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये, "जो कोणी सलमान खान किंवा दाऊद टोळीला मदत करेल त्यांचा हिशोब केला जाईल," असे म्हटले आहे.

आशुतोष मसगौंडे

बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. रविवारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीने जारी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये, "जो कोणी सलमान खान किंवा दाऊद टोळीला मदत करेल त्यांचा हिशोब केला जाईल," असे म्हटले आहे.

दरम्यान भास्करच्या ताज्या वृत्तानुसार या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली आहे. कारण बाबा सिद्दिकींच्या हत्येत चार नव्हे तर 10 ते 15 जणांचा सहभाग होता असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. शनिवारी रात्री बाबा त्यांचा मुलगा झीशानच्या ऑफिसमध्ये गेले होते आणि घराकडे निघाले होते.

दसऱ्यामुळे रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. यावेळी 10 ते 15 जणांचा टोळका बाबा सिद्दीकी यांच्याकडे आला आणि त्यांना विचारले की, तुम्ही आमच्यासोबत दसरा साजरा करणार का?

बाबा सिद्दीकी यांचा स्वभाव अतिशय मवाळ होता आणि ते अशा गोष्टींमध्ये मिसळत असत. दसऱ्याच्या दिवशीही त्यांनी असेच केले आणि त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी फटाके फोडण्यासही सुरुवात केली. यानंतर, बाब गाडीच्या पुढील सीटवर बसू लागताच, फटाक्यांच्या आवाजाचा फायदा घेत त्यांच्या गोळीबार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील व्हीव्हीआयपी भाग असलेल्या वांद्रे येथे गोळ्या झाडण्यात आल्या. रात्री 11.27 वाजता लीलावली रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी विरोधी राजकीय पक्ष सरकारी व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत.

बाबा सिद्दीकी यांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली असतानाही अशा प्रकारे गोळीबार झाल्याची घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक तपासात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव समोर आले आहे. पोलीस या प्रकरणातील प्रत्येक पैलूंचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

SCROLL FOR NEXT