मुंबई

''बॅटिंग करायला मिळाल्यावर अधिक मजा येते''- देवेंद्र फडणवीस

पूजा विचारे

मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दादरमध्ये 
क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केलं. यावेळी त्यांच्यासोबत आमदार कालिदास कोळंबळकर ही उपस्थित होते. या उद्घाटनानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बॅटिंग करायला मिळाल्यावर अधिक मजा येते. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, क्रिकेट खेळताना नेहमीच मजाच येते आणि विशेषत: बॅटिंग करायला मिळाली तर त्यात अजून मजा येते. मी लहानपणीही क्रिकेट खेळायचो. बॅटिंग आणि बॉलिंगही करायचो. मात्र फिल्डिंग मात्र क्वचितच करायचो. पण ज्यावेळी मी फ्लिडिंग करायचो त्यावेळी माझ्याकडून कॅच कधीच सुटायची नाही. 

माझं ठरलं आहे मी वेगवान बॉलिंगही करणार आहे. मी गुगलीही करणार आहे.  बॅटिंगलाही शॉट देखील मारणार आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये इतके लूझ बॉल मला मिळत आहेत. त्यामुळे ते बॉल मला सीमा रेषेपुढे पाठवावेच लागतात, असंही ते मिश्किलपणे म्हणालेत. 

मी बॉडी लाईन बॉलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल योग्य अशाप्रकराचा बॉल असतो. म्हणूनच मला असं वाटतं की, समोरच्यांना बॅटिंग करताना तो बॉल खेळताना थोडी अडचण होते, असं म्हणत फडणवीसांनी नाव न घेता सरकारला टोला लगावला आहे. 

फडणवीस यांनी रश्मी शुक्ला प्रकरणावरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, माझा सवाल असा आहे की, चौकशी कोणाची केली पाहिजे ज्यांनी चोरी पकडली, की त्यांची केली ज्यांनी चोरी केली त्यांची. ज्यांनी चोरी केली त्यांना आम्ही मोकाट सोडू आणि का बरं पकडलं याकरिता आम्ही चौकशी करु. हा काही जो सरकारचा न्याय आहे. यातूनच हे सरकार कोणाला पाठिंशी घालतंय. हे स्प्ष्ट पणे दिसंतय, असं ते म्हणालेत. 

तसंच खरंतरं जे संवाद आहेत. जे व्यवहार झालेले आहेत. जी हफ्तेखोरी झालेली आहे. या ठिकाणी जे रॅकेट तयार झालेलं आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची मानसिकता या सरकारची नाही. रॅकेट बाहेर काढणाऱ्यांवर हे सरकार कारवाई करत असल्याचीही टीका फडणवीस यांनी केली आहे. 

Devendra Fadnavis Dadar today Inaugurated cricket tournament

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT