Dhananjay Munde 
मुंबई

धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर

ओमकार वाबळे

Dhananjay Munde Hospitalized : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. (Minister Dhananjay Munde Heart Attack) सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे तातडीने मुंडेंच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

प्रवास करुन थकल्याने अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले होते. त्यातच ते चक्कर येऊन खाली कोसळले. त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडे यांना किरकोळ त्रास जाणवू लागला होता. (Dhananjay Munde in Breach Candy Hospital)

मंगळवारी सकाळपासून धनंजय मुंडे यांना अस्वस्थ वाटत होते. शेवटी संध्याकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना स्ट्रोक आल्याचे समजते. धनंजय मुंडे हे सायंकाळी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर होते. जवळपास 06.30 पर्यंत ते त्याच ठिकाणी होते. अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात 07.00 च्या दरम्यान दाखल करण्यात आलं.

सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती असून याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. संध्याकाळच्या वेळी अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आवश्यक त्या तपासण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, मुंडे यांची प्रकृती चांगली असल्याचेही सांगण्यात येत आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT