OBC leader Prakash Shendge esakal
मुंबई

Dhangar Reservation: "सरकारनं आजच अहवाल स्वीकारावा अन्यथा..."; धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगेंचा गंभीर इशारा

धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात काम करण्यासाठी शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात काम करण्यासाठी शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं आपला अहवाल राज्य सरकारकडं सादर केला आहे. पण सरकारनं तो अद्याप स्विकारलेला नाही, त्यामुळं धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी सरकारला आजच हा अहवाल स्विकारण्याचं आवाहन केलं आहे, त्याचबरोबर एक गंभीर इशाराही दिला आहे.

प्रकाश शेंडगे म्हणाले, "धनगर आरक्षणाच्या एसटी समाजात समावेश करण्याची अंमलबजावणी करण्याचा जीआर हा आचारसंहिता लागण्यापूर्वी काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. यासाठी त्यांनी १५ दिवसांची मुदत दिली होती ती देखील आता संपलेली आहे"

हा जीआर काढण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा दुवा जो आहे तो सुधारकर समितीचा अहवाल आहे. हा अहवाल गेल्या २ तारखेला शासनाकडं सादर झालेला आहे. पण त्या २ तारखेपासून ७ तारखेपर्यंत हा अहवाल शासन दरम्यान धुळखात पडून आहेत. कुठलीही यंत्रणा किंवा मुख्यमंत्र्यांना यासाठी वेळ नाही आणि यंत्रणाही गाफील आहे.

त्यामुळं मंत्रालयात आज मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि ओबीसी कल्याण मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना भेटून मी सांगितलं आहे की, आज हा अहवाल सादर नाही झाला तर प्रकाश शेंडगे आणि समितीतील सदस्य लोक हे मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या टाकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यानंतर त्याचे जे पडसाद उमटतील महाराष्ट्रात त्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनावर राहील. त्यामुळं आजच्या आज हा अहवाल स्विकारावा आणि आचारसंहितेसाठी जर जीआर नाही निघाला तर धनगर समाजाचा उद्रेक महाराष्ट्रात पाहायला मिळेल, अशा इशारा यावेळी प्रकाश शेंडगे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

SCROLL FOR NEXT