Dharavi-Ward-Officer-Dighavkar 
मुंबई

धारावीतील कोरोना 'असा' रोखला- वॉर्ड आफिसर दिघावकर

धारावीत आज एकही कोरोना रूग्ण नाही; महापौरांकडून कौतुक

विराज भागवत

धारावीत आज एकही कोरोना रूग्ण नाही; महापौरांकडून कौतुक

मुंबई: राज्यासह मुंबईत (Mumbai) हळूहळू कोरोनाची (Corona) रूग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबईतील दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीमध्ये (Dharavi) कोरोना शिरला तर तेथे हाहा:कार माजेल असा अंदाज तज्ज्ञांनी कोरोनाच्या सुरूवातीला व्यक्त केला होता. पण पहिल्या लाटेच्या वेळी धारावीकरांनी शिस्त पाळली आणि कोरोनावर मात (Corona free) केली. पहिल्या लाटेत तब्बल सात वेळा धारावीमध्ये एकही रूग्ण (No Active Cases) न आढळण्याची घटना घडली होती. दुसऱ्या लाटेत (Second Wave) धारावीमध्ये काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात रूग्ण सापडत होते. पण, अखेर आज पहिल्यांदाच धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा शून्यावर गेला. धारावीतील कोरोना कसा रोखला याबद्दल तेथील वॉर्ड ऑफिसर दिघावकर यांनी संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली. (Dharavi becomes Corona Free because of aggressive testing Ward Officer Kiran Dighavkar Tells Secret)

"मुंबईच्या धारावीमध्ये आज एकही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळला नाही. मुंबई महापालिका प्रशासनाने याबद्दलची आकडेवारी जाहीर केली. ८ एप्रिलला धारावीमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक ९९ रूग्ण आढळले होते. त्यामुळे हा संसर्ग कसा रोखला? असा प्रश्न साऱ्यांना पडल्याचे दिसत आहे. याबद्दल धारावीचे (G North ward) वॉर्ड ऑफिसर किरण दिघावकर यांनी माहिती दिली. "पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धारावीमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणार याची आम्हाला कल्पना होती. त्याच अंदाजामुळे आम्ही आधीपासून तयारीत होतो. दोन्ही लाटेत आम्ही चाचण्यांवर भर दिला. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जेव्हा धारावीत काही लोक पॉझिटिव्ह आले, तेव्हा आम्ही दारोदारी जाऊन अनेकांच्या चाचण्या केल्या. नियोजनबद्ध चाचण्यांमुळेच आम्ही वेळेत कोरोनाला पसरण्यापासून रोखू शकलो", अशी माहिती किरण दिघावकर यांनी दिली.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी धारावीकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. "धारावीचा परिसर हा खूप दाटीवाटीचा आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावीकरांनी योग्य ती खबरदारी घेतली आणि पालिकेने घालून दिलेले नियम पाळले. त्यामुळे पहिल्या लाटेतून धारावीकर सुखरूप बाहेर आले. दुसऱ्या लाटेमध्ये धारावीत खूपच चिंताजनक स्थिती निर्माण झाली होती. अतिशय गजबज असलेल्या धारावीत दुसऱ्या लाटेत आज पहिल्यांदाच शून्य रूग्ण आढळले. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे वाक्य नीट आचरणात आणलं आणि पालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य केलं तर धारावीसारखा दाटीवाटीचा परिसरही कोरोनामुक्त होऊ शकतो हे आज सिद्ध झाले. या प्रयत्नांसाठी धारावीकरांचे आभार आणि अभिनंदन", अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी धारावीकरांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

WPL 2026: Mumbai Indians चे आव्हान संपले! दिल्ली कॅपिटल्सच्या युपीवरील विजयाने प्लेऑफचं चित्र स्पष्ट

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

SCROLL FOR NEXT