वाडा ः भातकापणीच्या कामात व्यस्त असलेले शेतकरी.
वाडा ः भातकापणीच्या कामात व्यस्त असलेले शेतकरी.  
मुंबई

उमेदवारांना संवादासाठी दिवसा भेटेनात मतदार

सकाळ वृत्तसेवा

वाडा ः सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांचे उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी जात आहेत; मात्र वाडा तालुक्‍यात सध्या दिवसा मतदार भेटणे कठीण झाले आहे. 

वाडा तालुक्‍यात पावसामुळे रखडलेली भातकापणीची कामे सध्या जोरात असल्यामुळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने शेतावर जात असल्याने उमेदरावारासह कार्यकत्यांना दिवसा रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. 

वाडा तालुका हा तीन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. भिवंडी ग्रामीण मतदारसंघात ७१, शहापूर ४९ आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघात ४२ मतदान केंद्रे आहेत. सर्वच विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांचे उमेदवार कार्यकर्त्यांसोबत जोरदारपणे प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. 

तालुक्‍यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. नुकतीच पावसाने विश्रांती घेतल्याने तयार झालेले भातपीक कापून ते घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांनी भातपीक कापून ते घरी आणण्यासाठी जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि डहाणू या तालुक्‍यातून मजूर आणले असून भातकापणीचे काम सध्या जोरात सुरू आहे.

त्यामुळे शेतकरी जास्त प्रमाणात शेतावरच असल्याचे चित्र आहे. एकीकडे निवडणूक काही दिवसांवर आली असून उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांच्या दारात येत असूनही ते घरात नसल्यामुळे त्यांनी अनेकदा प्रचाराशिवाय माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे सकाळी लवकर आणि सायंकाळी प्रचाराचे नियोजन आखले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT