मुंबई

मालवणकर झळकले टपाल तिकिटावर!

दिनेश गोगी

उल्हासनगर : एकेकाळी पत्रकारितेत आणि त्यानंतर सामाजिक, राजकीय सोबत विशेषतः साहित्य क्षेत्रात ठसा उमटवणारे किंबहुना योगदान देणारे उल्हासनगरातील दिलीप मालवणकर यांच्या या योगदानाची दखल भारत सरकारने घेतली आहे. त्यांचा सन्मान म्हणून मालवणकरांच्या फोटोसह पाच रुपयांचे टपाल तिकीट जारी केले आहे. या टपाल तिकिटाच्या प्रकाशनाचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

काही आघाडीच्या वर्तमानपत्रात काम करताना दिलीप मालवणकर यांनी त्यांचे स्वतःचे साप्ताहिक 'अजब लोकशक्ती' काढले होते. यासोबतच त्यांनी कविता, अभंग, पुस्तके अशा साहित्य क्षेत्राकडे मोर्चा वळवला. प्रभंजन, कवडसे, बाप माझा सांगून गेला हे कविता संग्रह. आपले उल्हासनगर, हार-प्रहार, मालवणी मसाला आदी पुस्तके प्रकाशित केली. त्यांचे अभंग गाजले. मालवणकर हे दोन वर्षांपासून ऑनलाईन कविता स्पर्धेचे आयोजन करत त्यात राज्य-देश-विदेशातील स्पर्धेक भाग घेत आहेत. मालवणकरांच्या याच वाटचालीची दखल घेऊन भारत सरकारने त्यांच्या फोटोसह टपाल तिकीट काढले असून, त्याची किंमत पाच रुपये आहे.

या टपाल तिकिटाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम उल्हासनगरातील कालिका कला मंडळाच्या सभागृहात थाटात पार पडला. यावेळी 'दिलीप मालवणकर साहित्य दर्शन' हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. मालवणकरांच्या जीवनावरील एक माहितीपट (डाॅक्युमेंटरी) बघण्याचा योग मान्यवरांना मिळाला.

दिव्यांग कवी हर्षद जाधव, दिपाली वाघमारे व सुधा म्हात्रे यांनी आपल्या ब्रेल लिपीतील कविता सादर करून रसिकांची मनमुराद दाद मिळवली. शाहिर खेरटकर यांनी त्यांच्या दमदार आवाजातील शाहिरीची झलक दाखवली. कुंदा झोपे यांनी राज्यस्तरीय विनोदी कथा लेखन स्पर्धेतील विजेती विनोदी कथेचे कथा कथन करून रसिकांना हसण्यास भाग पाडले. कवी गझलकार माधव डोळे, शिक्षक साहित्यिक शांताराम निकम, जिजाबाई सावंत, वनिता सोनवणे यांनी मालवणकरांवर स्तुतीसुमने उधळली.

बाॅलीवुड गायिका चंद्र कला यांनी आपली गाणी सादर केली. आंतरराष्ट्रीय कीर्तिचे पारंपारिक ढोल वादक व 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड'वर नोंद असलेले पहिलवान डाॅ.बाळासाहेब मंगसुळे खास आले होते.

हिंदी चित्रपट सृष्टीतील लेखक, निर्माते व दिग्दर्शक रमेश मल्होत्रा, ब्युटी व योगा क्वीन, मेंबर ग्लोबल टॅलेंट पूल,यू.के. श्वेता वरपे, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या ब्युटी क्वीन व माॅडेल स्मृति पंचाल, बाॅलीवुड टी.व्ही.अॅन्ड सिने रायटर असो.चे डायरेक्ट डाॅ.सुधीर तारे, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, प्रा.डां.बाळासाहेब लबडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा टपाल तिकिटाचा सोहळा पार पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT