shivsena - mns 
मुंबई

ठाण्यात सेना-मनसेतील 'त्या' वादावर अखेर पडदा 

दीपक शेलार

ठाणे : ठाणे- पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर गेले काही दिवस समाजमाध्यमावर शिवसेना आणि मनसेमध्ये चांगलाच वादंग रंगला होता. मनसेचे समर्थन केले म्हणून मारहाण करून एका तरूणाविरोधात शिवसैनिकांनी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला. मात्र, आता ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर वादविवाद टाळण्यासाठी तसेच, कोरोना आणि सणासुदीचे दडपण पोलिसांवर असल्याने या वादावर पडदा टाकल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. तसेच, उचलून नेणे हा आमचा धंदा नाही. तर, ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना उद्देशून ते वक्तव्य केले होते.

बाळासाहेबांच्या शिवसैनिकांबद्दल नितांत आदर आहे असेही जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. कोव्हिड उपाययोजनेवरून सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्यानंतर शिवसेना विरुद्ध मनसे असे वाक:युदध रंगले होते. त्यातच मनसेच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मंगेश माने या तरूणाविरोधात गुन्हा दाखल झाला.  

या पार्श्‍वभूमीवर सोमवारी अन्य एका प्रकरणाबाबत नौपाडा पोलिस ठाण्यात आलेल्या अविनाश जाधव यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल मांगले यांची भेट घेतली. तसेच, गणेशोत्सवात पोलिसांवरील ताण पाहता दोन्ही पक्षांकडून या वादावर पडदा टाकल्याचे सांगितले. जाधव यांनी भेट घेतल्याच्या वृत्ताला निरिक्षक मांगले यांनीही दुजोरा दिला. 

(संपादन : वैभव गाटे)

dispute between shivsena and MNS in thane is calmed down

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईकरांनो आनंदाची बातमी! जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड सुस्साट होणार, मार्गावरील मोठा अडथळा पालिकेने दूर केला

IND vs AUS 1st T20I: ओव्हर्स कमी होण्यामागे पाऊस नव्हे, तर भलतंच कारण! तुम्हाला कळलं तर म्हणाल, आमच्या इथे असं कधी होत नाही...

November Horoscope Marathi : नोव्हेंबरमध्ये 'या' 3 राशींच्या लोकांना त्रासयोग; यात तुमची रास तर नाही ना? पाहा अन् करा सोपा उपाय

थिएटरमध्ये थंड प्रतिसाद पण ॲमेझॉन प्राईमवर Trend होतोय उमेश-प्रियाचा सिनेमा ! टीमने व्यक्त केला आनंद

Ravina Gaikwad : उत्कृष्ट कामगिरी! शेतमजुराच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत डंका; वणीच्या रवीना गायकवाडने पटकावले १० हजार मीटरमध्ये रौप्यपदक

SCROLL FOR NEXT