disputes between bjp and shivsena on seats distribution
disputes between bjp and shivsena on seats distribution  
मुंबई

Vidhan Sabha 2019 : युती झाली तरी 'या' जागांचं काय?

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : मुंबई : भाजप-शिवसेना युतीचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असतानाच राज्यातील काही जागांवर युतीचे पुन्हा एकदा वाद सुरू झाले आहे. तुम्हाला जागा हव्या असल्यास तुम्ही संपर्क साधा, आम्ही कोणत्याही प्रकारचा संपर्क साधणार नाही, असा इशारा भाजपकडून मिळत आहे. 

शिवसेनेच्या काही जागांबाबतच्या मागण्या अवास्तव आहेत. आम्ही आमच्या महत्त्वाच्या जागा सोडणार नाही. अशीही भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा पेचात पडण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत मंदा म्हात्रे-गणेश नाईक, साताऱ्यातील माणमध्ये जयकुमार गोरे, वर्ध्यात सुरेश देशमुख असे सेना भाजप वाद सुरू आहेत. त्यामुळे भाजपने युतीची तयारी दाखवली असली, तरी काही जागांवर शिवसेना कोंडीत येण्याची शक्यता आहे. 

लोकसभा निवडणुकीत समसमान जागांचे ठरले होते. त्यानुसार 135/135 देण्याची तयारी भाजपने ठेवली आहे. काही ठिकाणी निवडून येण्याजोगा उमेदवार नसेल तर तेथे भाजप चेहरा द्यायला तयार आहे. मात्र साताऱ्यातील माणचे जयकुमार गोरे पक्षात आले आहेत. यामुळे ती जागा आम्ही कशी सोडणार, असे भाजपने नमूद केले आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपदही शिवसेनेलाच देणार असल्याची ग्वाही दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT