मुंबई

दिवाळीचा फराळ महागला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, खमंग फराळ. आताच्या धावपळीच्या जगात गृहिणींना दिवाळी फराळ बनवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे तयार फराळाला गृहिणींची पसंती मिळते. परंतु या वर्षी महागाईची झळ तयार फराळालाही बसली असून फराळाच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. 

गेल्या चार-पाच वर्षांत तयार फराळाच्या मागणीची ग्राहकांकडून दुपटीने वाढ झाली. रोजचे काम; त्यातून फराळ बनवण्यासाठी सवड नसल्याने तयार फराळच घरोघरी विकत घेतला जातो. दरवर्षी डाळींचे वाढणारे भाव, जीएसटीची पडलेली भर, महागडा गॅस, वाढलेल्या तेलाच्या किमती यामुळे फराळाच्या किमती वाढल्या आहेत. वाढलेल्या भावामुळे घरगुती फराळ बनवणाऱ्या महिला उद्योजकांना महागाईची झळ सोसावी लागली. फराळाचे दर वाढवले तर ग्राहक तुटतात, या भीतीने केवळ १० ते १५ टक्के दर वाढवण्यात आलेले आहेत. तयार फराळामध्ये चकली, शेव, चिवडा, बेसन लाडू या पदार्थांना जास्त मागणी आहे. 

    पूर्वी                            आता
भाजणी चकली    ३५०       ४००
करंजी    १५                     २०-२५
बेसन लाडू      १२ ते १५     १८ ते २० 
तिखट शेव    २००             २५०                    
लसूण शेव    २१०              २६०
गोड शंकरपाळी    २५०        २८० ते ३००
चिवडा    ३००                    ३२० ते ३५०
खारे शंकरपाळी    २००        २५० 

डाळींचे वाढलेले भाव 
तूरडाळ    ९५ ते १००            ११०-१२०
मूगडाळ    ९५                     १००-११०
चणा डाळ     ८०                  ९०-१००
उडीद डाळ    ९५                   १२०-१३०

दिवाळीच्या फराळावर सर्वांत जास्त फटका जीएसटीमुळे बसला आहे. त्यामुळे फराळ महागतो. त्याचबरोबर डाळीपासून ते तेल, तुपापर्यंत सर्वांच्या दरात वाढ झाली. त्यामुळे फराळा किमती प्रति किलोमागे ५० रुपयांनी वाढवले आहेत. दर वाढवल्याने ग्राहक तुटण्याचीही भीती असते. दरवर्षी २५ किलो दिवाळी फराळ बनवते. 
- नीलिमा बिरजे, फराळ व्यावसायिक

डाळी महाग झाल्या आहेत, त्याचा परिणाम फराळाच्या िंकिमतीवर होतो. फराळामध्ये सर्वात जास्त मागणी भाजणीची चकली आणि शेवेला असते. बेसन लाडूलाही मागणी असते. या वर्षी फराळाच्या किमतीत १० ते १५ टक्‍क्‍यांनी वाढ केली 
- भक्ती सावंत, घरगुती फराळ व्यावसायिक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT