dog nad rat  sakal
मुंबई

Dog Died Due To Poison: उंदराचे विषारी पदार्थ खाल्ल्याने पाळीव श्वानाचा मृत्यू; पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल!

सकाळ डिजिटल टीम

Dog Died Due To Poision : मालाड पश्चिमेतील रहिवासी सोसायटीत बुधवारी उंदीर मारण्यासाठी ठेवलेला विषारी पदार्थ खाऊन पाळीव श्वानाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी मालवणी पोलिसांनी सोसायटीमध्ये पेस्ट कंट्रोलचे काम करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. एलियल गोन्सालविस असे त्याचे नाव आहे.

तक्रारदार प्रकाश अयंगार मालाड पश्चिमेतील मढ परिसरात वास्तव्यास आहेत. तक्रारदारांनी सोसायटीमध्ये चार ते पाच श्वान पाळले होते. बुधवारी इमारतीच्या वाहनतळ परिसरात त्यांचा सिम्बा नावाचा श्वान बेशुद्धावस्थेत आढळला. त्याबाबतची माहिती मिळताच अयंगार यांनी त्याला तात्काळ मालाडमधील खासगी क्लिनिकमध्ये नेले. तपासणीनंतर श्वानाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

चौकशीदरम्यान एलियलने उंदीर मारण्यासाठी विष मिसळलेले खाद्यपदार्थ विविध ठिकाणी ठेवल्याचे समोर आले. वाहनतळातील विषारी पदार्थ खाल्ल्याने ‘सिम्बा’चा मृत्यू झाल्याचे समजताच पोलिसांनी प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT