MLA Raju Patil Sakal
मुंबई

MLA Raju Patil : निवडणूका आल्याने यांचे फार्स झाले चालू; इंडिया आघाडी व महायुतीवर मनसेचा टोला

इंडिया आघाडी आणि महायुती यांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून यावर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत सणसणी टोला हाणला आहे.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - इंडिया आघाडी आणि महायुती यांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून यावर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत सणसणी टोला हाणला आहे.

निवडणुकांचे वारे चालू झाले आहेत म्हणून या सर्वांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरू झाले आहे.

एकमेकांच्या कुरघोड्या काढण्यातच यांचा पूर्ण दिवस गेला. एक सांगतो यांची मीटिंग चुकीची कशी, एक सांगतो काय खातात, एक सांगतो काय करतात, एकमेकांवर आरोप करण्यात हे व्यस्त आहेत. लोकांच्या काय गरजा आहेत, काय प्रश्न आहेत, समोर महागाई आहे, रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, दळणवळणची काय परिस्थिती आहे, मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यावर कोणी काही बोलत नाही.

मला माझ्या पक्षाचा अभिमान आहे की मनसे प्रमुख राज ठाकरे एकमेव आमचे असे नेते आहेत की ज्यांनी कोकणात रस्त्यांवरचे खड्डे पडले आहे त्या विरोधात आवाज उठविला. एवढे मोठे जवळपास 100 किलोमीटरची आम्ही पदयात्रा काढली. त्यावर हे कोणी बोलले नाहीत त्यामुळे निवडणूका आल्याने त्यांचे फार्स चालू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT