डोंबिवली - निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गाचा अवलंब करत ठाकरे गटाला धक्के देत आहेत. तर दुसरीकडे शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मात्र शिंदे गटाला जबर धक्का दिला आहे. शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत घरवापसी होणार आहे. एक व्हिडिओ व्हायरल करत त्यांनी सर्वांची माफी देखील मागितली आहे.
शहापूर विधानसभेचे माजी आमदार व सद्या शिवसेना शिंदे गटाचे नेते पांडुरंग बरोरा आपल्या समर्थकासह लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेतली आहे.
राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी लढून 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केलेल्या शहापूर विधानसभेचे माजी आमदार व शिवसेना शिंदे गटाचे नेते पांडुरंग बरोरा आपल्या समर्थकासह लवकरच शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या निवास्थानी शरद पवार भेट घेतली होती. यानंतर त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल करत सर्वांची माफी मागितली आहे.
नेमकं काय बोलले आहे या व्हिडीओ मध्ये पांडुरंग बरोरा
सर्व शहापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनी आणि आदरणीय शरद पवार साहेबांना प्रेम असतं सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मी सर्वप्रथम माफी मागतो की 2019 ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत गेलो खऱ्या अर्थाने ती चुकत होती माझी आणि म्हणून सर्वप्रथम मी सर्व जनतेची पदाधिकांची माफी मागतो
आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी उभा केला आणि काही महिन्यापूर्वी आदरणीय पवार साहेबांना काय मंडळी एकटेच सोडून इतर पक्षाची सोबत गेले माझे वडील स्वर्ग अशी मनामना साहेब यांच्या आणि पवार साहेबांचे 1978 सालापासूनचे चाळीस वर्षाचे जुने संबंध शेवटच्या घटकापर्यंत माझे वडील आदरणीय पवार साहेबांच्या सोबत राहिले आणि त्यावेळेस ते गेल्यानंतर माझ्याकडून जी चूक झाली होती
मी त्यांना सोडलं आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल प्रति आमच्या कुटुंबीय आमचे काका यांनी मला सल्ला दिला की आपण पवार साहेबांच्या सोबत त्या एकटे पडलेल्या आपण त्यांच्यासोबत राहिला पाहिजे पक्षात शेवटपर्यंत राज्याची भूमिका तुम्ही आमच्या पक्षाचे कुटुंब प्रमुख आमचे काकांनी या ठिकाणी घेतली आणि मी सर्वांच्या कार्यकर्त्यांची पदाधिकांची भेटी घेऊन मी आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत जाण्याचा
मी आता निर्णय घेतला आदरणीय पवार साहेबांना भेटून पवार साहेबांनी मला त्याठिकाणी आशीर्वाद दिला आणि पुन्हा माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार साहेबांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या काही दिवसांनी पवार साहेब सोबत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी करणार आहे असे आपले मनोगत मानत मनात खंत व्यक्त करत पुन्हा एकदा शरद पवार गटात जाणार असल्याची त्यांनी सांगितले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.