fraud sakal
मुंबई

Dombivali News : विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या तरुणीची 32 लाखाला फसवणूक

माझी करिअर्स ॲन्ड ऑप्शन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश मेहता

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - शिक्षणासाठी विदेशात जायचे असल्याने सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी एका विदेशी सेवा देणाऱ्या कांदिवली येथील एजन्सी सोबत डोंबिवली मधील तरुणीने संपर्क साधला. या एजन्सीने या तरुणीची 32 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. जेनिशा पाटील असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझी करिअर्स ॲन्ड ऑप्शन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश मेहता, व्यवस्थापकीय संचालक स्टेला राकेश मेहता यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी सांगितले, तक्रारदार आयरे गावात राहणाऱ्या रिध्दी पाटील यांची मुलगी जेनिशा ही इंग्लडमधील लकेस्टर विद्यापीठात, पेस विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणार होती. या विद्यापीठात भारतामधून जाण्यासाठी करावयाच्या अत्यावश्यक प्रक्रिया आणि विदेशातील विद्यापीठात जाईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची हमी माझा करिअसर्स एजन्सीने स्वीकारली होती.

कोणतीही धावपळ न करता एजन्सीच्या मार्फत काम होते म्हणून पाटील कुटुंबीयांनी या एजन्सीच्या संचालकांवर विश्वास ठेऊन त्यांनी 12 लाख 98 हजार, 19 लाख 45 हजार रूपये असे एकूण 32 लाख रूपये एजन्सीने केलेल्या सूचनांप्रमाणे त्यांच्या बँक खात्यावर जमा केले. 90 दिवसांच्या कालावधीत जेनिशाचा विदेशातील प्रवेश आणि परेदश प्रवासाच्या प्रक्रिया पूर्ण करून सर्व कागदपत्रे आपल्या ताब्यात देण्यात येतील, असे आश्वासन संचालकांनी दिले होते.

परंतु, 90 दिवसांचा कालावधी संपुनही माझा करिअर्स एजन्सीने विहित वेळेत कागदपत्रे पाटील यांना दिली नाहीत. याबाबत रिध्दी पाटील यांनी एजन्सी संचालकांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसे परत करण्यास ते तयार नाहीत. फेब्रुवारी 2021 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

मुलीच्या शिक्षणाचे विदेश दौऱ्याचे नियोजन एजन्सीने विस्कळीत केले. तसेच भरणा केलेली रक्कम एजन्सी चालक परत करण्यास तयार नाहीत. त्यामुळे पाटील कुटुंबीयांनी माझा करिअर संस्थेच्या संचालकांविरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात गुरूवारी तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक जी. आर. जाधव तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT