Rashmi Thackeray Sakal
मुंबई

Rashmi Thackeray : शिंदेंच्या बंडानंतर प्रथमच रश्मी ठाकरे कल्याणमध्ये

कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिंदे गटातील बंडखोर आमदार विश्वनाथ भोईर यांचा मतदारसंघ आहे. याच मतदार संघात शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी ठाकरे गटाकडून रश्मी यांचे जंगी स्वागत करत शहरात शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

कार्यक्रम दरम्यान महिलांनी बाईपण भारी देवा या गीतावर ठेका धरत स्त्री शक्ती रुपात अनोखे स्वागत केले. यावर रश्मी यांनी देखील हात उंचावत त्यांना प्रतिसाद देत मान स्वीकारला. यावेळी रश्मी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही मात्र त्यांचा पाठीवर असणारा हात आणि त्यांची उपस्थिती हेच प्रेरणादायी असल्याचे मत महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे यांच्यावतीने श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

शिवसेनेत शिंदे व काही आमदारांच्या बंडानंतर प्रथमच रश्मी या कल्याण मध्ये आल्या. ठाणे येथे त्या येऊन गेल्या होत्या मात्र कल्याण डोंबिवली या सेनेच्या बालेकिल्लात ठाकरे परिवार कधी उपस्थिती लावणार याविषयी चर्चा होती. शुक्रवारी आयोजित कार्यक्रमास त्या आल्या यावेळी ठाकरे गटाकडून दुर्गाडी चौकात त्यांचे स्वागत शिवसैनिकांनी केले.

यानंतर शिवाजी चौक येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण केल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात रश्मी यांचे जंगी स्वागत करत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आचार्य अत्रे रंगमंदिरात श्रावणसरी कार्यक्रमात सभागृहात उपस्थित सर्व महिलांनी बाईपण भारी देवा गाण्यावर ठेका धरत महिला शक्ती प्रकट केली.

महिलांचा प्रतिसाद पाहून रश्मी यांनी उभे राहत महिलांना हात दाखवून प्रतिसाद दिला. यावेळी रश्मी यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी त्यांची उपस्थिती व त्यांची पाठीवर पडलेली कौतुकाची थाप हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कल्याण मधील महिला आघाडीतील महिला कार्यकर्त्या या फुटल्या नसून त्या एकनिष्ठ आहेत. आणि आमच्या सांगण्यावरून त्या इथे आल्या याचा मला आनंद असल्याचे महिला संघटक पोटे यांनी सांगितले.

यादरम्यान ठाकरे गटातील एका महिला पदाधिकाऱ्याने रंगमंदिर बाहेर ठिय्या मांडत नाराजी व्यक्त केली. त्यांना या कार्यक्रमास आमंत्रित केले नसल्याने त्यांनी हा ठिय्या मांडला. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत काढत प्रकरण थंड केले.

यावर पोटे यांना विचारले असता त्या म्हणाल्या कोणाची ही कोणती ही नाराजी नाही. हा महिला आघाडीचा कार्यक्रम होता. सर्वच महिलांना याची माहिती होती, वैयक्तिक असे कोणाला आमंत्रित केले गेले नव्हते, तसा प्रश्नच येत नाही.

यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने प्रवक्ते महेश तपासे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात येऊन रश्मी यांचे कल्याण नगरीत स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT