Attack
Attack Sakal
मुंबई

Dombivali Crime : भर रस्त्यात दोन तरुणांवर तलवारीने वार; कल्याण पूर्वेत दहशतीचे वातावरण

शर्मिला वाळुंज

जुन्या वादातून चौघांनी दोन तरुणांना भर रस्त्यात तलवारीने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली.

डोंबिवली - जुन्या वादातून चौघांनी दोन तरुणांना भर रस्त्यात तलवारीने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. तलवारीच्या हल्ल्यात अक्षय कवडे (वय 24) व अविनाश झा उर्फ ए.जे. हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात खंजीर उर्फ कुलदिप, राकेश हाजरा, मनिष चौहाण आणि मुकेश हाजरा या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलिस चौघांचा शोध घेत आहेत.

कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी येथे राहणारा अक्षय हा कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर चे काम करतो. त्याच परिसरात राहणारे राकेश व मुकेश हे दोघे भाऊ व मनिष याच्याशी अक्षय याची चांगली ओळख होती. दोन वर्षापूर्वी मनिष याचे एका व्यक्तीसोबत भांडण सुरु असताना भांडणात दगड हा अक्षय याला लागल्याने अक्षय याचे त्यांच्या सोबत भांडण झाले होते. तेव्हापासून या तिघांना अक्षय याचा राग होता. शनिवारी रात्री 2 ते 3 च्या दरम्यान अक्षय हा घरी जात असताना चेतना परिसरात आय.जी. मेडीकल समोर तो मित्र माणिक याच्यासोबत बोलत उभा होता. त्यावेळी पाठीमागून चक्की नाक्याचे दिशेने राकेश व खंजीर हे दोघे मोटारसायकलवर एक सफेद रंगाची गोणी घेऊन आले.

पाठीमागे बसलेल्या खंजीर याने गोणी जमिनीवर टाकून गाडीवरुन खाली उतरत "तुम्हांला सोडत नाही आता, असे धमकावत शिवीगाळ करून गोणीतून तलवार बाहेर काढली. त्याने अक्षयचा मित्र अविनाश याच्या हाता पायावर तलवारीने वार केले. अविनाश व अक्षय याने यावेळी हाजी मलंग च्या दिशेने बचावासाठी धावण्यास सुरुवात केली. त्याचवेळी समोरुन मनिष व मुकेश हे अक्षय अविनाश यांच्या दिशेने धावत आले. त्यांनी तलवारीने वार करत दगडाने मारहाण करत अक्षय व अविनाश यांना गंभीर जखमी करत नंतर तेथून पळ काढला.

अक्षय याने त्यानंतर मित्र कुशाल व रोशन पाटील यांना बोलावून घेत मानपाडा पोलिस ठाणे गाठले. तेथून त्यांना उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारानंतर कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली असल्याने अक्षयने कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठत चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु केला आहे.

मनिष, राकेश व मुकेश हे माजी सरपंच राहूल पाटील यांच्याकडे कामास आहेत. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून सदर मारहाणीचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. त्यानुसार पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT