crime news  esakal
मुंबई

Crime News : डोंबिवली - चोरट्यांनी सात औषध दुकाने फोडली

चोरट्यांनी डोंबिवलीतील औषध विक्रीची दुकाने देखील लक्ष केली असून मेडिकलमधील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

शर्मिला वाळुंज

चोरट्यांनी डोंबिवलीतील औषध विक्रीची दुकाने देखील लक्ष केली असून मेडिकलमधील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

डोंबिवली - चोरट्यांनी डोंबिवलीतील औषध विक्रीची दुकाने देखील लक्ष केली असून मेडिकलमधील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरटे मालमत्तेचे तसेच दुकानातील औषधांचीही नासधूस करत असल्याने मेडिकल चालक हैराण झाले आहे. महिनाभराच्या कालावधीत डोंबिवलीतील सात औषधांची दुकाने चोरट्यांनी फोडली असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप देशमुख, नीलेश वाणी, दुधनाथ यादव यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांची सोमवारी भेट घेतली. मानपाडा पोलीस हद्दीतील एस. एस. मेडिकल, लोढा हेवन मधील निळजे मेडिकल, जनेरिकार्ट, संगीतावाडी मधील सिद्धी मेडिकल, गेटवेल मेडिकल, स्वामी मेडिकल, नांदिवली रस्त्यावरील विजया मेडिकल ही दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत.

मेडिकल मधील मालमत्तेचे चोरटे नुकसान करतात. त्यासोबतच गल्ल्यातील रोख रक्कम, खाण्याच्या आवश्यक वस्तू, काही औषधे चोरट्यांनी चोरुन नेली आहेत. या चोरीला आळा घालण्यासाठी मेडिकल दुकाने असलेल्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी यावेळी संघटनेने केली. चोरट्यांना पकडण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करावे. मेडिकलमधील सीसीटिव्ही मध्ये चोरटे कैद झाले असल्याने त्यांचा लवकर शोध घेतला जावा, मेडिकलमध्ये एक व्हिजीट बूक ठेवण्यात यावे अशी मागणी यावेळी संघटने कडून करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT