MNS Protest Sakal
मुंबई

Dombivali News : उल्हासनगर महापालिकेसमोरच फुटली भ्रष्टाचाराची दहीहंडी

पालिकेतील भ्रष्टाचाराचा मनसेने केला अनोखा निषेध

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - दहीहंडी उत्सवाच्या एक दिवस आधीच उल्हासनगरात भ्रष्टाचाराची हंडी फुटली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतील कारभार विरोधात मनसेने भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडत निषेध केला.

उल्हासनगरच्या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारा जवळच मनसेचे पदाधिकारी बुधवारी एकत्र जमले होते. प्रवेशद्वारावर विविध विभागाची नावे व त्याखाली पैशांच्या बनावट नोटा चिटकवून पालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यात आली.

याविषयी मनसेचे पदाधिकारी मनोज शेलार म्हणाले, उल्हासनगर महापालिकेचे बजेट हे 800 कोटींपर्यंत पोहोचले आहे. आणि सर्वसामान्य जनतेला या 800 कोटींमधून काय मिळाले हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. 800 कोटींचे बजेट हे दरवर्षी खर्च केले जाते.

महानगरपालिकेच्या ऑडिटमध्ये समजते की 800 कोटी खर्च झालेले आहेत. आज आपण येथे पाहिले तर डम्पिंगचा विषय तसाच आहे, खड्ड्यांचा विषय असो, शैक्षणिक, आरोग्याचे विषय जसेच्या तसे आहेत. मग हे 800 कोटी रुपये कुठे खर्च होतात आणि कोण खर्च करतो हे जनतेला समजले पाहिजे.

या महानगरपालिकेमध्ये आर्थिक साटेलोटे अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे महाराष्ट्र शासनाने येथे अधिकारी पाठवण्याआधी त्यांची चौकशी केली पाहिजे. अशी आमची मागणी आहे.

एक वर्ष राहिल्यानंतर त्यांना मूळ पोस्ट वरती पाठवावे. उल्हासनगर शहराचा कोणताही विकास होत नसून पालिकेचे नाव मात्र खराब होत असल्याने आज आम्ही भी भ्रष्टाचार ची हंडी येथे फोडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

Maharashtra Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी मोठे भाकीत; कोकण, मध्य महाराष्ट्रसह घाटमाथ्यावर बरसणार पाऊस

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

Latest Marathi News Live Update: शेतातील सुपीक मातीची चोरी, तक्रार दाखल

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT