Fraud news
Fraud news  esakal
मुंबई

Dombivali Crime : मलेशियन एअर लाईन्स मध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - मलेशियन एअर लाईन्स मध्ये नोकरीची संधी असल्याचे आमिष दाखवत डोंबिवलीतील तरुणाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. नोकरी न मिळाल्याने तसेच पैसे ही परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुण आदित्य दिक्षित याने याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार प्रदीप ढोणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई येथे राहणाऱ्या प्रदिप याने चार वर्षापूर्वी आदित्य याच्याशी ओळख वाढवली. मलेशियन एअरलाईन्स कंपनीत आपली ओळख असून तेथे ॲडमिरल एव्हिएशनमध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे, असे सांगितले. आदित्य याने प्रदीपच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. प्रदीपने प्रशिक्षणाच्या नावाखाली आदित्यकडून 5 लाख 20 हजार रुपये उकळले.

पैसे देऊन झाल्यानंतर आदित्य यांनी आपणास प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी कधी मिळेल म्हणून प्रदीपकडे विचारणा सुरू केली. तो उलटसुलट उत्तरे देऊ लागला. आरोपीच्या वेळ काढूपणामुळे आदित्यला तो आपणास फसवत आहे असे जाणवले. काम होणार नसेल तर आदित्यने प्रदीपकडे पैसे परत करण्याची मागणी सुरू केली. प्रदीप त्याला दाद देत नव्हता.

सततच्या पाठपुराव्याने आरोपीने आदित्यला 2 लाख 20 हजार रुपये परत केले. चार वर्षाच्या कालावधीत उर्वरित 3 लाखाची परत करण्यास प्रदीपने नकार दिल्याने आदित्यने प्रदीप विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT