Thane sakal
मुंबई

Thane: डोंबिवलीत भाजपला धक्का; विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने दिला पदाचा राजीनामा

शर्मिला वाळुंज

Thane: डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा प्रभागाचे भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. म्हात्रे यांनी मंगळवारी डोंबिवली पश्चिम भाजप अध्यक्ष समीर चिटणीस यांच्याकडे मंगळवारी हा राजीनामा सुपूर्द केला आहे. म्हात्रे यांच्या या राजीनामा नाट्याने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही प्रभागात विकास कामासाठी निधी मिळत नसल्याने म्हात्रे यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असून याच नाराजीतून हा राजीनामा म्हात्रे यांनी दिल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट व भाजपा यांच्यातील नाराजी ही उघड उघड दिसून आली आहे. तर दुसरीकडे मनसे व ठाकरे गट देखील येथे सक्रिय झाला आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना एक मोठा धक्का त्यांच्याच पक्षातील एका पदाधिकाऱ्याने दिला आहे. भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी भाजप पक्षातील सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे व काही कार्यकर्त्यांनी आपला सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

निवडणुका तोंडावर आल्या आहेत. प्रभागात विकास कामे करण्यासाठी निधी नाही. निधी नसल्याने रस्ते, गटारे इतर कामे होत नसल्याने प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते तीव्र नाराज आहेत. केंद्र, राज्यात भाजपची सत्ता असताना आपणास निधी का मिळत नाही, असे प्रश्न कार्यकर्ते करत असल्याने विकास म्हात्रे हा विषय वरिष्ठांकडे मांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. युतीची सत्ता खासदार, मंत्री आपल्या युतीचा आहे. तरी कामे का होत नाही. यांच्यातील मतभेद का थांबत नाही असे विकास म्हात्रे यांनी बोलून दाखविले होते.

प्रभागातील पाणी समस्या, रस्त्यांची समस्या असो. अन्य काही समस्या असो नागरीकांसमोर भाजप कार्यकर्ते बोलू शकत नव्हते. ही परिस्थिती गरीबाचा पाडा आणि राजूनगर परिसरात उद्धवली होती. वारंवार मागण्या आणि विनवणी करुन देखील काही फरक पडला नाही. अखेर विकास म्हात्रे, त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांच्यासह प्रभागातील कार्यकर्त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. विकास म्हात्रे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, आमच्या प्रभागात अपुऱ्या निधीमुळे विकास खुंटला आहे. वारंवार पत्रव्यवहार करुन देखील दखल घेतली जात नाही. अनेक रस्त्याची कामे अपुरी आहेतः पावसाळ्यात रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य पसरल्याने नागरीकांमध्ये आमच्या विरोधात असंतोष आहे.

पत्नी कविता यांच्या राजूनगर प्रभागात आपल्या गरीबाचापाडा प्रभागात एकही रस्ते काम झाले नाही. रस्ते खड्डेमय झाले आहेत. ही कामे करण्यासाठी निधी नाही. या नागरी समस्यांमुळे दररोज नागरिकांच्या रोषाला आपणास आणि प्रभागातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते. भाजप विषयी प्रभागात नाराजी पसरल्याने लोकप्रतिनिधी म्हणून आपण कमी पडतो असे वाटत असल्याने आपण भाजप सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहोत, असे विकास म्हात्रे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

विकास म्हात्रे भाजपकडून स्थायी समितीत सभापती होते. शिवसेना शिंदे गटातील नेते विकास म्हात्रे यांच्या मागील वर्षापासून संपर्कात आहेत. याला म्हात्रे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद अद्याप आलेला नाही. पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी म्हात्रे यांची नाराजी कशी दूर करतात हे आता पहावे लागेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant Statement : नवी मुंबई विमानतळ नामकरावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे महत्वपूर्ण वक्तव्य; "धमक्या दिला तर कारवाई"

Nagpur Truck Accident: विटा घेऊन जाणारा ट्रक पलटी; तीन मजुरांचा जागीच मृत्यू, तीन जखमी

RBI Job: RBI मध्ये सुरुवातीलाच 1.5 लाख पगाराची संधी! अर्ज करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

Mumbai Local: लोकलमधील सीटचा वाद विकोपाला! आधी शाब्दिक वाद, नंतर मारहाण अन् थेट प्रवाशावर हल्ला

SCROLL FOR NEXT