

mumbai local
esakal
ठाणे : लोकलमधील सीटवरून झालेल्या वादातून एका प्रवाशावर हल्ला करण्यात आला. यात राजेंद्र सोनू सकपाळ (५५, रा. भांडुप पूर्व) हे जखमी झाले असून, त्यांच्या कपाळाला चार टाके पडले आहेत. सकपाळ हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंडियन कस्टमच्या एआययू पथकात चालक म्हणून कार्यरत आहेत.