technical failure sakal
मुंबई

Mumbai News: ठाकुर्ली कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक मंदावली

Mumbai News: ठाकुर्ली कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटनेमुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, वेळापत्रक सुधारत नसल्याने आधीच मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने होत असतानाच मंगळवारी ठाकुर्ली कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याची घटना संध्याकाळी 7.15 वाजता घडली.

त्या घटनेमुळे धीम्या मार्गावरील वाहतूक तब्बल 30 मिनिट उशिराने आहे. काही लोकल डोंबिवली, ठाकुर्ली,कल्याण मार्गावर एकापाठोपाठ उभ्या होत्या. त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. नेमका बिघाड काय झाला होता. याबाबत डोंबिवली लोहमार्ग पोलीस काही माहिती देऊ शकले नाहीत. परंतू ठाकुर्ली कल्याण मार्गावर सिग्नल नसल्याने डाऊन धीम्या मार्गावर लोकल उभ्या असून त्या गर्दीने खच्चून भरल्या होत्या.

प्रवासी म्हणणे आहे की ओव्हरहेड वायरची समस्या असल्याचे म्हणाले तर कोणी सिग्नल फेल असल्याचे म्हंटले. रेल्वेकडून त्यास दुजोरा मिळाला नाही. त्या घटनेमुळे रात्री उशिरापर्यंतची लोकल वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडल्याने त्याचा त्रास चाकरमान्यांना झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT