मुंबई

मीडियाशी बोलू नका - उद्धव

सकाळवृत्तसेवा

मुंबई - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे अडचणीत आलेले खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना "तो कर्मचारी वेडाच होता,' अशी प्रतिक्रिया दिली. दुपारी शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना टाळले. "मीडियाशी बोलू नका,' अशी सूचना ठाकरे यांनी दिल्यामुळेच खासदार गायकवाड यांनी या प्रतिनिधींशी बोलण्यास नकार दिल्याचे समजते.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे गायकवाड यांनी स्वत:च माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले होते. त्यानंतर ते चांगलेच वादात अडकले. एअर इंडियापाठोपाठ सर्वच विमान कंपन्यांनी त्यांच्यावर बंदी घातली. या बंदीवरून शिवसेनेने लोकसभेत गोंधळ घातला. त्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली. गायकवाड यांनी शुक्रवारी लोकसभेत निवेदन केल्यानंतर एअर इंडियाने त्यांच्यावरील बंदी उठवली; मात्र गायकवाड आज राजधानी एक्‍स्प्रेसने मुंबईत आले.

रेल्वे स्थानकावर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना, "एअर इंडियाचा तो कर्मचारी वेडा होता. मी माफी मागणार नाही,' अशी ताठर भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मात्र गायकवाड यांचा तोरा कमी झाला. उद्धव यांच्याशी चर्चा करून ते बाहेर आल्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT