मुंबई

कल्याणमध्ये 409 मद्यपी चालकांचे वाहन परवाने निलंबित 

सकाळवृत्तसेवा

कल्याण - दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. गेल्या वर्षी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 409 वाहनचालकांचे परवाने 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले; तर 225 जणांवर कारवाई केली जाणार आहे. यापुढे दारू पिऊन वाहन चालवताना आढळणाऱ्या चालकाचा परवाना 6 महिने निलंबित केला जाईल, असे संकेत आरटीओने दिले आहेत. 

अनेक रस्ते अपघात वाहनचालकांनी दारूच्या नशेत वाहन चालविल्यामुळे होत असल्याचे विविध अहवालांतून निष्पन्न झाले आहे. अशा अपघातांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांमार्फत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. गेल्या वर्षी 'ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह'विरोधात धडक कारवाई करण्यात आली. नव्या वर्षात बेशिस्त वाहन चालकांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे दारू पिऊन वाहन चालविल्यास संबंधित वाहनचालकाचा परवाना 6 महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. 

प्रतिक्रिया : 
गेल्या वर्षी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. संबधित वाहनचालकांचे परवाने 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. यापुढे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकाचा परवाना 6 महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. 
- संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण परिवहन कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT