मुंबई

भिवंडीत डम्परने महिलेला चिरडले

सकाळ वृत्तसेवा


भिवंडी : खराब रस्ते व खड्ड्यांमुळे भिवंडीत आणखी एक बळी गेला आहे. भरधाव डम्पर खड्ड्यात आदळून रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेस ठोकर दिल्याने महिलेचा चाकाखाली चिरडून मृत्यू झाला.

गुरुवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भिवंडी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय हसीन सिनेमाशेजारी हा अपघात झाला. मयत महिलेची ओळख पटली नाही. कल्याण नाक्‍याच्या दिशेने निघालेला डम्पर चालकाचा खड्ड्यामुळे वाहनावरील ताबा सुटल्याने या डम्परने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेस चिरडले.

या अपघातात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. नागरिकांनी डम्परचालकास निजामपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. दत्ता चंदू काळे (५५, रा. कासार वडवली) असे चालकाचे नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महिलेचा मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मयत महिलेची ओळख पटविण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक डोळस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT