मुंबई

एक मार्चपासून राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे; वर्षा गायकवाड यांचे निर्देश

संजीव भागवत

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. अमरावती, यवतमाळ आदी शहर आणि जिल्ह्यात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर एक मार्चपासून राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये  बंद ठेवण्याचा निर्णय  स्थानिक प्रशासनाने घ्यावा, असे स्पष्ट निर्देश आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. 

राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी अपवाद वगळता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये ही मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच राज्यात कोरोना वाढत असल्याने अनेक विद्यार्थी, शिक्षक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यातील काही खाजगी आणि सरकारी व्यवस्थपनाच्या शाळांमध्ये आपल्या पालकांनी मुले पाठवणे थांबवले असल्याचे समोर आले होते. शिवाय कोरोनाचा नवीन प्रकार आल्याच्या चर्चा माध्यमांवर सुरू झाल्याने पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 यामुळे शिक्षण विभागाने अनेक जिल्ह्यात शाळा सुरू ठेवण्याची सक्ती करू नये अशी मागणी पालक संघटनांकडून करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एक ट्विट करून एक मार्चपासून राज्यातील शाळा बंद ठेवण्याचे निर्णय प्रशासनाने घ्यावेत असे निर्देश दिले आहेत. त्या आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, "राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्च 2021 पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्यात येत आहेत."

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

eduction news marathi decision close schools state from March1local administration Directed by Varsha Gaikwad live update

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT