Eknath shinde latest political News Sakal
मुंबई

कुर्ला इमारत दुर्घटना: एकनाथ शिंदेंकडून पाच लाखांची मदत जाहीर

मंगेश कुडाळकर या बंडखोर आमदारानेही मदत जाहीर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतल्या कुर्ला भागात आज पहाटे एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, राज्याचे नगरविकास मंत्री आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी या दुर्घटनाग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. तसंच बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांनी ही मदत जाहीर केली आहे. (Kurla Building Collapsed)

कुर्ला इमारत दुर्घटना प्रकरणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सूचनेवरून मंगेश कुडाळकर यांनी मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपयांची मदत तर जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली. मंगेश कुडाळकर हे सध्या बंडखोरांच्या गटात गुवाहाटीला आहे.

मुंबईतल्या (Mumbai News) कुर्ला इथं नाईक नगर परिसरात चार मजली इमारत कोसळली. यामध्ये सध्या ८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. जखमींमध्ये सर्व पुरुषांचा समावेश आहे. जखमी झालेल्यांमध्ये साधारणतः २५ ते ४० वयोगटातले आहेत. या इमारतीला महापालिकेकडून (BMC) नोटीस देण्यात आली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT