eknath shinde  sakal
मुंबई

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात अशी सुरू आहे स्वातंत्र्य दिनाच्या सेलिब्रेशनची तयारी

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. या दिवसानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

यातच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा दिवस साजरा करण्याची हटके पद्धत सुद्धा आली आहे. बाजारात या दिवसासाठी देशप्रेम दर्शवणारे टी-शर्ट, कुर्ता, महिलांसाठी साड्या, ओढणी, पर्स, बांगडया, ब्रेसलेट अशा विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. स्वातंत्र्यदिन सोहळा एक दिवसाचा असतो; परंतु अलीकडे या दिवसाला सेलिब्रेशनचा साज आल्याचे चित्र आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. देशप्रेम दर्शवणारे, एकतेचा संदेश असणाऱ्या विविध वस्तू उपलब्ध झाल्याआहेत. देशाचे नाव लिहिलेले टी-शर्ट , विविध संदेश लिहिलेले टी-शर्टेसने दुकाने सजली आहेत. पुरुषांसाठी व महिलांसाठी तिरंग्याच्या रंगामध्ये पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि कुर्ता- दुपट्टा, अशोक चक्राची बॉर्डर आणि पायजमा उपलब्ध आहेत. तिरंग्याचे रंग असलेला दुपट्ट्याला मागणी आहे.

लहान मुलांच्या टी-शर्टमध्ये यंदा नवनवीन प्रकार आले आहेत. लहान मुलांसाठी ताजमहाल आणि इंडिया आसलेले, भारताचा नकाशा असलेले , जय हिंद वंदे मातरम् असे देशप्रेमाचे संदेश संदेश लिहिलेले टी-शर्ट ठाणे बाजारात दाखल झाले आहेत.

गेल्या वर्षी हे टी-शर्ट १०० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होती, परंतु यंदा १२० रुपयांपासून ते ३५० रुपयांपर्यंत करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT