Eknath Shinde vs uddhav thackeray  sakal
मुंबई

Eknath Shinde: काँग्रेस-राष्ट्रवादीला माहितीए 'त्यांचा' चेहरा चालणार नाही, मग महाराष्ट्राला कसा चालेल?; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

दसरा मेळाव्यात ठाकरेंनी भाषणाच्या शेवटी आपल्या मुख्यंमत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याचा जुना व्हिडिओ दाखवला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मुख्यमंत्रीपदासाठी मविआत रस्सीखेच सुरु असल्याचा आरोप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांचा चेहरा चालणार नाही हे काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलंच माहिती आहे, मग हा चेहरा महाराष्ट्राला कसा चालेल? असा प्रश्न करत त्यांनी ठाकरेंवर टोला लगावला आहे.

"मलाच मुख्यमंत्री करा अशा मागणी उद्धव ठाकरे करत आहेत. पण त्यांचा चेहरा चालणार नाही हे त्यांच्या मित्रपक्षांनाच वाटतं आहे. मग तो महाराष्ट्राला कसा चालेल?" अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, हरियाना विधानभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाल्यानंतर काँग्रेसलावर टीका करताना महाराष्ट्रातही अशी परिस्थिती ओढवू नये म्हणून आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, जो कोणी चेहरा असेल त्याला आपला पाठिंबा असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

पण नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ठाकरेंनी भाषणाच्या शेवटी आपल्याच मुख्यंमत्रीपदाच्या कार्यकाळात झालेल्या शपथविधीची व्हिडिओ क्लीप दाखवून उपस्थितांना देखील भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याची शपथ दिली होती. यावरुन ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक असल्याची चर्चा सुरु झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT