मुंबई

Eknath Shinde Vs BJP: डोंबिवली विधानसभेसाठी दीपेश म्हात्रे इच्छुक, भाजप विरोधातच शिवसेनेची तयारी

Dombivli Political News : आता भाजप व शिंदे गटात पुन्हा खडाजंगी होणार का ? याची चर्चा आता रंगू लागली आहे.

शर्मिला वाळुंज

Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्षांकडून सुरू झाली असताना इच्छुकांच्या आशा देखील पल्लवीत झाल्या आहेत. डोंबिवली विधानसभा मतदारसंघावर भाजपचा पहिला दावा असेल असे विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी नुकतेच केले आहे.

याच मतदारसंघात भाजपचे मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे हे देखील आमदारकी लढविण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे या मतदारसंघावरून आता भाजप व शिंदे गटात पुन्हा खडाजंगी होणार का ? याची चर्चा आता रंगू लागली आहे.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेले तीन टर्म मंत्री रविंद्र चव्हाण हे येथील आमदार आहेत. भाजपकडे हा मतदारसंघ असताना आता राज्यातील महायुतीतील मित्र पक्षातील शिवसेना शिंदे गटाने या मतदारसंघावर आपला दावा केला आहे. महाराष्ट्र युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी आपण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असताना भाजपने याठिकाणी दावा करत शिवसेना शिंदे गटाला धारेवर धरले होते. लोकसभा निवडणूकीनंतर आता विधानसभा निवडणुकीत डोंबिवली विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाने दावा करत भाजपला आव्हान दिले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्व व डोंबिवली विधानसभा मतदारसंघावर भाजपचा पहिला दावा असेल असे जाहीर सांगितले होते.

यानंतर आता शिवसेना शिंदे गटाने येथून तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे हे येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. आपण तयारी सुरू केल्याचे म्हात्रे यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले शिवसेनेचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे...

डोंबिवली व कल्याण ग्रामीण विधानसभेत आमची तयारी सुरू आहे. दोन्ही ठिकाणी आमचे निरीक्षक नेमलेले आहेत. पक्षाची बांधणी शहरात कशी मजबूत होईल यासाठी प्रयत्न करतोय. पक्षाने जबाबदारी दिली तर दोन्ही विधानसभेत आम्ही लढू शकू आणि आमची लढायची तयारी आहे. मी डोंबिवली मधून इच्छुक आहे, माझी इच्छा देखील आहे की डोंबिवलीतन निवडणूक लढवावी. पक्षाची जी भूमिका असेल त्यासोबत मी बांधील आहे.

14 वर्षाचा वनवास संपवणार

गेल्या 14 वर्षाचा डोंबिवलीचा वनवास तो संपण्यासाठी नवीन नेतृत्व नवीन चेहरा समोर येत असेल तर त्याला लोकांनी पाठबळ दिलं पाहिजे. असा टोमणा देखील म्हात्रे यांनी विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांना टोला लगावला आहे. डोंबिवली शहराची टप्प्याटप्प्याची दुरावस्था बाहेर काढणार आहे. शहराच्या दृष्टीने कुठलेही काम झालं नाही. डोंबिवली आमच जन्मगाव आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. डोंबिवली व कल्याण विधानसभेत आम्ही आमचा प्रयत्न शंभर टक्के करणार असे म्हात्रे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT