student exam
student exam sakal
मुंबई

अकरावी सीईटी परिक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात : विनाशुल्क परिक्षा

संजीव भागवत

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द (SSC Exam Canceled)केल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने अकरावीच्या परीक्षेसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भातील जीआर आज जारी करण्यात आला आहे.

दहावीचा निकाल(SSC result)15 जुलैच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता असल्याने ही सीईटी परीक्षा (CET Exam)जुलै महिन्याच्या अखेरीस अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाणार आहे,या सीईटीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेश प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पुण्यासारख्या शहरातील नामांकित महाविद्यालयातील प्रवेश हे सीईटीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावरच ठरवले जाणार आहेत.(Eleventh Admission CET Exam GR Announced)

ही सीईटी परीक्षा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती स्थापन केली आहे. यामध्ये राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सदस्य बालभारतीचे सदस्य असतील तर आयुक्त परीक्षा परिषदेचे संचालक हे सदस्य सचिव आहेत.शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात येणारी सीईटीची ही परीक्षा राज्य शिक्षण मंडळासोबतच सीबीएसई, आयसीएसई आणि इतर सर्व आंतरराष्ट्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांना राज्यात होणाऱ्या अकरावीच्या प्रवेशासाठी द्यावी लागणार आहे. तसेच ही परीक्षा पूर्णत: ऐच्छिक ठेवण्यात आली आहे.

सीईटी ही परीक्षा दहावीच्या एकूण अभ्यासक्रमावर आधारित असून इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी 25 गुण असणार आहेत. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे आणि ओएमआर पद्धतीने असणार आहे.

ही परीक्षा 100 गुणांची आणि एकच प्रश्नपत्रिकेची असेल व या परीक्षेचा कालावधी दोन तासाचा असेल. ही परीक्षा शिक्षण आयुक्त यांच्या देखरेखीखाली तसेच राज्य शिक्षण मंडळ राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून आयोजित केली जाणार आहे. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य शिक्षण मंडळ आणि परीक्षा परिषदेमार्फत घोषित केले जाणार आहे.ज्या विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची नाही, अशा विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात जागा खुल्या असल्यास त्या जागांवर दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणाच्या आधारे त्या गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT