अशोक गावडे यांनी मतदारांना प्रत्यक्ष भेटून प्रचार केला
अशोक गावडे यांनी मतदारांना प्रत्यक्ष भेटून प्रचार केला 
मुंबई

राष्ट्रवादीचा प्रत्यक्ष भेटींवर भर

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई शहरातील बेलापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी आता मतदारांना प्रत्यक्ष भेटून प्रचार करण्यावर भर दिला आहे. नेरूळ, जुईनगर, सानपाडा व बेलापूर विभागातील कानाकोपरा अक्षरशः पिंजून काढला. या भागातील विविध रहिवासी सोसायट्यांमध्ये जाऊन गावडे यांनी मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदारांनीही गावडे यांना चांगला प्रतिसाद दिला.

विधानसभेच्या मतदानाकरिता आता एक आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक गावडे हे प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत. मतदारांना भेटून त्यांच्या समस्या, प्रश्‍न व गाऱ्हाणी ऐकून घेत त्यांच्याकडून प्रचार करण्याचा धडाका गावडे यांनी लावला. शुक्रवार आणि शनिवारी असे दोन्ही दिवस गावडेंनी मतदारांना भेटण्यासाठी नेरूळपासून सुरुवात केली. नेरूळमधील विविध एलआयजी, मिनी पॉकेट्‌स, एमआयजी सोसायट्यांमध्ये जाऊन प्रचार केला. ओम गणेश सोसायटीतही गावडेंनी प्रचार केला. काही भागांत पायी चालत रॅली काढली. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

नेरूळ व जुईनगर येथे इंटकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या उपस्थितीत गावडे यांनी जोरदार प्रचार केला. याप्रसंगी गावडे यांनी स्थानिक महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण यांची भेट घेऊन निवडणुकीचा आघाडीचा जाहीरनामा समजावून सांगितला. गावडे यांच्याकरिता स्थानिक मतदारांच्या एका छोटेखानी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष शेट्टी यांच्या उपस्थितीत गावडे यांनी मतदारांना आवाहन केले.

प्रश्‍न मार्गी लावणार
नेरूळमधील पश्‍चिम महाराष्ट्रातील रहिवासी, माथाडी कामगार, भाजीपाला मार्केटमधील व्यापारी यांची भेट गावडे यांनी घेतली. आघाडीच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न, मोडकळीस आलेल्या घरांचे पुनर्वसन, गरजेपोटी घरांचे प्रश्‍न मार्गी लावणार असल्याचे आश्‍वासन गावडे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT