Godrej industries sakal media
मुंबई

पर्यावरणासाठी गोदरेजचा उपक्रम; निसर्ग हाच खरा सांताक्लॉज

कृष्ण जोशी

मुंबई : पर्यावरणाची जपणूक (Environment caring) करण्याचे महत्व सर्वांना पटविण्यासाठी, निसर्ग (Nature) हाच खरा सांताक्लॉज ही जनजागृती मोहीम (Public Awareness campaign) गोदरेज इंडस्ट्रीज (Godrej Industries) तर्फे मुंबई महापालिकेच्या (BMC) सहकार्याने हाती घेण्यात आली आहे. मुंबईच्या वांद्रे येथील कार्टररोडच्या समुद्रकिनारी आज या मोहिमेचे उद्घाटन (Inauguration) अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे (Ashiwini bhide) तसेच गोदरेजच्या कार्यकारी संचालक तान्या दुभाष (Tanya Dubash) यांच्याहस्ते झाले.

समुद्रकिनाऱ्यावरील एका मोठ्या समुद्रवृक्षाला सुशोभित करून त्याच्या डोक्यावर दहा फूट उंच अशी नाताळबाबाची लाल टोपी घालण्यात आली होती. निसर्ग हाच खरा सांताक्लॉज असून नाताळ सणाच्या निमित्ताने लोकांनी निसर्गाची जपणूक करावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. निसर्ग कायम सर्व माणसांना कोणताही भेदभाव न करता आपल्याकडे आहे ते सर्वकाही देत असतो. त्याबदल्यात आपल्याकडून काहीही मागत नाही.

त्यामुळे आपणच सजगपणे या निसर्गाची जपणूक करायला हवी, याच हेतूने हा उपक्रम सुरु केल्याचे श्रीमती तान्या दुभाष म्हणाल्या. निसर्गाची जपणूक करण्यावर गोदरेज इंडस्ट्री चा विश्वास आहे. सुंदर निसर्ग हेच आपल्याला मिळालेले सर्वात मोठे बक्षिस आहे, निसर्गाएवढा मोठा नाताळबाबा दुसरा कोणीच नाही. त्यामुळे प्रत्येकानेच पर्यावरणाची जपणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

सध्याच्या काळात निसर्गाचे संवर्धन होण्यासाठी जागरुकता आणि संवाद निर्माण करण्याची हीच वेळ आहे. पुढील पीढीला अधिक चांगला निसर्ग अनुभवायला मिळावा यासाठी अशा उपक्रमांची जरुरी आहे. गोदरेज इंडस्ट्रीज चा हा उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे श्रीमती भिडे यांनी बोलून दाखवले. निसर्ग हाच खरा नाताळबाबा असल्याने त्याचीच काळजी घेणे महत्वाचे आहे. झाडे लावण्याचे उपक्रम नेहमीच होतात, मात्र झाडांची काळजी घेण्याचा हा उपक्रम नाविन्यपूर्ण आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी गोदरेज चे तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT