yuvasena
yuvasena sakal media
मुंबई

युवासेना करणार वृक्षारोपण ; भारतीय प्रजातींची दहा हजार झाडे लावणार

- कृष्ण जोशी

मुंबई : पर्यावरणपूरक (environment supporting) आणि सजीव साखळीत महत्वाची भूमिका बजावणारे दुर्मिळ भारतीय प्रजातींचे दहा हजार वृक्ष ( Indian trees) उत्तर मुंबईत (north Mumbai) लावण्याचा संकल्प युवासेनेतर्फे (Yuvasena) सोडण्यात आला आहे. युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम (siddhesh kadam) यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या उपक्रमास नुकतीच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण (tree plantation) करून सुरुवात झाली. सामान्यतः आपल्याकडे पटकन वाढणारी व मोठी दिसणारी परदेशी निरुपयोगी झाडे लावण्याकडे सर्वांचा कल असतो. (environment supporting-Indian trees-Yuvasena-siddhesh kadam-tree plantation-nss91)

मात्र त्याला फळे फार नसल्याने पशू-पक्ष्यांसाठी ती निरुपयोगी ठरतात, तसेच काही प्रकारची परदेशी झाडे भूगर्भातील पाणीही पटकन संपवतात आणि मातीही निकृष्ट करतात. मात्र युवासेनेतर्फे कैलासपती, जारुळ, पंखा या दुर्मिळ झाडांबरोबरच जांभूळ, वड-पिंपळ, आवळा, चिंच अशी उपयुक्त झाडेही लावली जातील. नुकतीच महापौर किशोरी पेडणेकर, आमदार प्रकाश सुर्वे, नगरसेविका संजना घाडी, रिद्धी खुरसंगे आदींच्या उपस्थितीत या उपक्रमास सुरुवात झाली. मुंबई प्रदूषणमुक्त राहण्यासाठी अशा मोठ्या वृक्षमोहिमेची गरज आहे, अशा शब्दांत महापौरांनी या मोहिमेचे स्वागत केले. एक ते दोन महिन्यांत वृक्षारोपण पूर्ण केले जाईल, असे सिद्धेश कदम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT