मुंबई

School: उल्हासनगरातील 195 शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना !

Thane: शासकीय व खाजगी शाळांनी दक्षता घ्यावी व सौचालयाजवळ महिला सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai News:

बदलापूर मधील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर घृणास्पद अत्याचार झाल्याची चिढ आणणारी घटना घडल्यावर अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उल्हासनगर मधील सर्व शासकीय व खाजगी शाळांनी दक्षता घ्यावी व सौचालयाजवळ महिला सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.

अशा मागणीचे निवेदन एक हात मदतीचा सामाजिक संस्थेचे विजय कदम यांनी महानगरपालिका प्रशासनाधिकारी यांना दिले होते.या निवेदनाने पालिका इन-ऍक्शन-मोडमध्ये आली असून 195 शाळांतील मुख्याध्यापकांना विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आदर्श शाळेतील मुलींच्या सौचालयाजवळ महिला सफाई कर्मचाऱ्यां ऐवजी अक्षय शिंदे या कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती.त्याचाच गैरफायदा घेणाऱ्या या नराधमाने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

या प्रकाराची पुनरावृत्ती पालिकेच्या,शासकीय व खाजगी शाळेत घडू नये याकरिता शाळेमध्ये काम करणारे शिपायी तसेच सफाई कामगार यांची माहिती मागून घ्यावी.यात कुणी मनोरुग्ण आहे का याची चौकशी करावी.सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? याची पाहणी करावी.

शाळांमध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक जास्त प्रमाणात करून मुलींच्या सौचालयाजवळ महिला सफाई कर्मचाऱ्यांनाच ठेवावे.तसेच सर्व शाळांनी मुलींच्या सुरक्षेसाठी काय उपाय योजना केल्या आहेत यांची ही माहिती लेखी स्वरूपात घ्यावी अशी मागणी एक हात मदतीचा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय कदम यांनी प्रशासनाधिकारी दीपक धनगर यांना दिलेल्या निवेदनात केली होती.

या निवेदनाची दखल घेऊन इन-ऍक्शन-मोडमध्ये आलेल्या शिक्षण विभागाने 195 मुख्याध्यापकांची तातडीची बैठक महानगरपालिकेत बोलावली होती.प्रशासनाधिकारी दीपक धनगर,अधिकारी विलास गायकर,सतीश राठोड यांच्या उपस्थितीत सर्व मुख्याध्यापकांना विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच 195 शाळांपैकी 175 शाळेत सीसीटीव्ही कॅमेरांचा वॉच असून उर्वरितांना सीसीटीव्ही लावण्यास बजावण्यात आले आहेत.याशिवाय मुलींच्या सौचालयाजवळ महिला सफाई कामगार आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT