Vivek-Patil-Arrested
Vivek-Patil-Arrested 
मुंबई

विवेक पाटील यांना ईडीच्या स्पेशल कोर्टात करणार हजर

सुरज सावंत

मुंबई: कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात काल रात्री माजी आमदार विवेक पाटील (vivek patil) यांना ईडीकडून (ed) अटक करण्यात आली. आरोपी माजी आमदार विवेक पाटील यांना आता ईडीने कोर्टात हजर करण्यासाठी नेले आहे. ईडीच्या स्पेशल कोर्टात पाटील यांना हजर केले जाणार आहे. कर्नाळा नागरी सहकारी बॅकेच्या (karnala bank) ५२९ कोटीच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांचे संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. (ex mla vivek patil arrested for money laundering case of karnala bank in panvel raigad will present in special ed court)

५० हजार ६८९ ठेविदारांच्या ५२९ कोटीच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरुवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. ईडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील घरातून ताब्यात घेतलं. या गैरव्यवहारात मनी लाँडरिंग (Money Laundering) झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील ‘कर्नाळा नागरी सहकारी बँक‘ गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने माजी आमदार विवेक पाटील यांना पनवेल येथून मंगळवारी रात्री अटक केली. या प्रकरणातील 512 कोटी रुपयांच्या संशयित मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. कर्नाळा बँकेत कोट्यावधींचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी ठेवीदारांनी आंदोनही केले होते. यावेळी पनवेलमधील स्थानिक आमदाराने याप्रकरणात ईडीला पुरावे सादर केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT