मुंबई

पोलिसांसाठी सर्वात मोठी बातमी, निवृत्तीच्या उंबरठ्यावरील मुंबई पोलिसांना मिळणार....

सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : कोरोनाचा फटका महाराष्ट्राला आणि त्यातही मुंबईला अधिक बसत आहे. याच दरम्यान रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. राज्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांना आधीच आपला जीव गमवावा लागला. याची गंभीर दखल घेत सेवनिवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांना बंदोबस्तात तैनात करू नये, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिला आहे. 

पोलिस आयुक्तांच्या निर्णयामुळे निवृत्तीकाळ जवळ आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जे कर्मचारी 55 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असतील, वैद्यकीयदृष्ट्या फिट नसतील, अशा कर्मचाऱ्यांनी बंदोबस्तात भाग घेऊ नये, घरीच सुरक्षित राहावे, घरी राहिलेला कालावधी पूर्ण पगारी रजा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे. 

पोलिस दलातील ज्येष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संपुष्टात येईपर्यंत हा आदेश कार्यरत राहील. तसेच, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी नियंत्रण कक्षात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोरोनाची लक्षणे आढळल्यास कर्मचाऱ्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला संपर्क करावा, त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही आयुक्तांनी म्हटले आहे. पोलिसांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT