मुंबई

महापरिनिर्वाणदिनासाठी एसटीच्या जादा गाड्या

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्ताने एसटी महामंडळाने जादा बसचे नियोजन केले आहे. मुंबई ते भिवंडी, मुंबई ते अलिबाग आणि दादर ते पनवेल मार्गावर जादा बस सोडण्यात येणार आहे. त्याशिवाय लांब पल्ल्याच्या सर्व बसेसना पनवेल ते मुंबईदरम्यान सर्व थांब्यावर बस थांबवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती एसटीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली. 

महापरिनिर्वाणदिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून लाखो अनुयायी मुंबईत येत असतात. या वेळी रेल्वे गाड्यांनाही प्रचंड गर्दी असते. त्या अनुषंगाने एसटीने जादा बसचे नियोजन केले आहे. एसटी जादा सेवा देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

दर वर्षीप्रमाणे महापरिनिर्वाणदिनानिमित्ताने एसटी यावर्षीसुद्धा जादा बसेस सोडणार आहे. गर्दीच्या ठिकाणी मागणीनुसार अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार आहे. 
- राहुल तोरो, वाहतूक महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ

पॅगोडासाठी विशेष सेवा

मुंबईतील गोराई येथील विश्व विपश्‍यना पॅगोडा येथे जाण्यासाठी भाईंदर बसस्थानकावरून नियमित बस सेवा आहे; मात्र महापरिनिर्वाणदिनानिमित्ताने मुंबईत दाखल होणाऱ्या अनुयायांसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहे. त्याशिवाय बोरिवली बसस्थानकावरूनही मागणीनुसार बस सोडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT