मुंबई

मध्यरात्रीपासून टोलनाक्यावर फास्टॅग सक्ती, फास्टॅग नसल्यास भरावा लागाणार दुप्पट टोल

प्रशांत कांबळे

मुंबई: राज्य सरकारने राज्यात पहिल्या टप्यात मुंबई 26 जानेवारी पासून द्रुतगती मार्ग आणि राजीव गांधी सागरी सेतू टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केले आहे. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 जानेवारीनंतर वाहतुकदारांना मुदतवाढ देऊन आता, 16 फेब्रुवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार आहे. शिवाय या टोल नाक्यांवर कॅश काउंटर नसणार आहे.

राज्यातील ट्रक, ट्रॅव्हल्स या 80 टक्के वाहतुकदारांनी आतापर्यंत फास्टॅगचा वापर सुरू केला आहे. मात्र, शिल्लक 20 टक्के वाहतुकदारांनी सुद्धा त्याचे काटेकोर पालन करण्यासाठी यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सुमारे 45 दिवसाची मुदतवाढ दिली होती. मात्र, 16 फेब्रुवारीनंतर आता राष्ट्रीय महामार्गांवर कॅश काउंटर नसल्याने सर्व वाहतुकदारांना फास्टॅग वापरणे बंधनकारक होणार आहे.

राज्यातील टोल नाक्यांवर काम सुरू

राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या राज्यभरातील इतर टोल नाक्यांवर मात्र अद्याप फास्टॅग अनिवार्य करण्यात आले नाही. सध्या पहिल्या टप्यात मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग आणि सी-लिंक या टोल नाक्यावरच्या फास्टॅग अनिवार्य आहे. दुसऱ्या टप्यात राज्यभरातील सर्व टोल नाक्यावर फास्टॅग अनिवार्य केले जाणार आहे. त्यासंदर्भातील तयारी अंतिम टप्यात आली असल्याचे टोल विभागाचे मुख्य व्यवस्थापक कमलाकर फंड यांनी सांगितले आहे.
 
महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग

  • NH3- मुंबई ते आग्रा, ठाणे-भिवंडी- नाशिक-धूळे मार्गे (391 किमी)
  • NH4 - मुंबई ते चेन्नई, पुणे - सातारा -कराड - कोल्हापूर - बेळगाव मार्गे (375 किमी)
  • NH4 ब - न्हावाशेवा ते पळस्पे (27 किमी) (राज्यातीलसर्वात कमी लांबीचा नॅशनल हायवे)
  • NH6- धूळे ते कोलकाता, धूळे - अकोला - बडनेरा - नागपूर मार्गे (686 किमी) (राज्यातील सर्वाधिक लांबीचा NH)
  • NH7 - वाराणसी ते कन्याकुमारी, बोरी-नागपूर- रामटेक (232 किमी)
  • NH8 - मुंबई ते दिल्ली, भायंदर - मनोर मार्गे (128 किमी)
  • NH9 - पुणे ते विजयवाडा, इंदापूर-सोलापूर मार्गे (336 किमी)
  • NH13 - सोलापूर ते मंगलूर विजापूर मार्गे (43 किमी)
  • NH16 - निज़ामाबाद ते जगदालापूर, गडचिरोली जिल्ह्याचा दक्षिण भागातून (40 किमी)
  • NH17 - पनवेल ते मंगलोर, रायगड -सावंतवाडी -पणजी मार्गे (482 किमी)
  • NH50 - पुणे ते नाशिक,संगमनेर - सिर मार्गे (192 किमी)
  • NH69 - नागपूर ते अब्दुल्लागंज (55 किमी)
  • NH204 - कोल्हापूर ते रत्नागिरी, पाली - कोल्हापूर- सांगली - सोलापूर - लातूर -वर्धा (974 किमी)
  • NH211 - सोलापूर ते धुळे
  • NH222 - कल्याण ते निर्मल

 
विना फास्टॅग वाहनांना दुप्पट टोल

राज्यातील वाहनधारकांना आणि वाहतुकधारकांना फास्टॅग बंधनकारक केले आहे. राज्यात 100 टक्के  फास्टॅग वापरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी टोल नाक्यांवर विना फास्टॅग वाहन आढळून आल्यास सुरुवातीला वाहनचालकाला त्याच टोल प्लाझावर फास्टॅग लावून घेणे अनिवार्य केले आहे. त्याशिवाय दंडाच्या स्वरूपात दुप्पट टोल वसूल करण्याचे आदेश सुद्धा एमएसआरडीसीने दिले आहे.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

FASTags starting February 15 midnight If there no fastag pay double toll

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: छठपूजा आणि मराठी-परप्रांतीय वादावर राज ठाकरेंचा निशाणा, शिवरायांचा उल्लेख करत म्हणाले...

Dog Bite Treatment: कुत्रा चावल्यानंतर लक्षणांची वाट पाहू नका; तातडीने उपचार घ्या, रिम्समधील तज्ज्ञांचा सल्ला

Microsoft: जगभरात मायक्रोसॉफ्टची सेवा विस्कळीत! ७४ देशांमधील आऊटलुक, टीम्स आणि कोपायलट ठप्प; कोट्यवधी वापरकर्त्यांना फटका

NCP Merger: पडद्यामागे मोठ्या घडामोडी! सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून आमदारांना फोन?, पुण्यात पार्थ पवारांनी बोलावली तातडीची बैठक

Latest Marathi News Live Update : नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या अदिती तटकरे दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईला रवाना

SCROLL FOR NEXT