पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील प्रश्नावर प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर लता कळंबे यांनी उपोषण स्थगित केले.
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील प्रश्नावर प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर लता कळंबे यांनी उपोषण स्थगित केले. 
मुंबई

मुंबई-गोवा महामार्गात लवकरच सुधारणा : लता कळंबे यांचे उपोषण मागे

सकाळ वृत्तसेवा

पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी शनिवारी (ता. ६) चौपदरीकरणात ३० ऑक्‍टोबरपर्यंत सुधारणा दिसेल, या प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर लता कळंबे यांनी उपोषण स्थगित केले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या समस्यांसाठी लता कळंबे यांनी २ ऑक्‍टोबरपासून उपोषणाचे हत्यार उपसले होते. महामार्गावर महिलांसाठी शौचालय उभारले जावे, तसेच नागरिकांसाठी विविध सोईसुविधा निर्माण व्हाव्यात, महामार्ग सुरक्षित व प्रवास करण्यालायक व्हावा, वाहतूक पोलिसांचा अभाव आदी मागण्या त्यांनी केल्या होत्या. मात्र, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा व्यस्त होत्या. त्यातच नेते व लोकप्रतिनिधींनीही या आंदोलनाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत होते. मात्र, उपोषणाच्या चौथ्या दिवशी कळंबे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय पोलादपूर केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. 

त्यानंतर तालुक्‍यातील सामाजिक समाजसेवक चंद्रकांत कळंबे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग महाड अधिकारी जे. ई. महाडकर, पोलादपूर नायब तहसीलदार देसाई यांनी कळंबे यांची भेट घेतली. महामार्ग अधिकाऱ्यांशी चर्चा करताना काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत व लवकरच सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. त्यावर कळंबे यांनी ३० ऑक्‍टोबरपर्यंतच्या मुदतीत प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, तर व्यापक स्वरूपाचे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला. 

राष्ट्रीय महामार्ग विभाग प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासन पत्रात म्हटले आहे की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ चौपदरीकरणाचे काम केंद्रीय परिवहन व राज्यमार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत सुरू आहे. इंदापूर ते कशेडी घाट ही लांबी स्टेट एजन्सीअंतर्गत या विभागाकडे आहे. या चौपदरीकरण अंतर्गत तीन पॅकेजचे काम सुरू आहे. या कामाची जबाबदारी एजन्सीची आहे. महामार्गावर प्रवाशांसाठी प्रसाधनगृह, उपहारगृह, पार्किंग व इतर सुविधा आहेत. महामार्गावरील सर्व पेट्रोल पंप व उपहारगृहात पिण्याच्या पाण्याची सुविधा असून, केंद्रीय परिवहन व राज्य मार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या निर्देशाने या सुविधा सर्वांसाठी खुल्या करण्यात आल्या असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. 

तालुक्‍याच्या वतीने चंद्रकांत कळंबे, दशरथ उतेकर, लक्ष्मण मोरे, पोलादपूर तालुका युवक संघटनेचे रामदास कळंब, प्रकाश सकपाळ, संभाजी साळुंखे यांनी उपोषण स्थगित करण्यासाठी पुढाकार घेतला. अखेर चौथ्या दिवशी सकाळी ११ वाजता चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते लिंबू पाणी प्राशन करून लता कळंबे यांनी आंदोलन स्थगित केले.

या चार दिवसांच्या उपोषणात तालुक्‍यातील व महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांनी कळंबे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला. यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना कोकणच्या कांचनताई बुटाला, समाजसेविका वैशाली भुतकर, शुभांगी चव्हाण, स्नेहा मेहता, चंद्रकांत घाडगे, डॉ. नितीन मपारा, लक्ष्मण साने, अशोक दाभेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी व नागरिकांचा सहभाग राहिला. चंद्रकांत साने, भरत शिवीलकर, प्रशांत लाड, गजा आंबेकर, प्रदीप ठक्कर, शंकर गाजरे यांची या उपोषणामध्ये सहकार्यासाठी महत्त्वाची भूमिका राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT