Sexual assault sakal media
मुंबई

बोईसरमध्ये नराधम बापाचा पोटच्या लेकींवर अत्याचार; आरोपी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

मनोर : बापानेच पोटच्या लेकींवर लैंगिक (Girls sexual assault) अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बोईसर पोलिस ठाणे (boisar police station) हद्दीतील शिगावच्या पवार पाड्यात हा प्रकार घडला. आरोपीच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून तो दोन्ही मुलींवर अत्याचार करीत होता. श्रमजीवी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली होती. त्यांनी पीडित मुलीला घेत बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणी आरोपीला अटक (culprit arrested) करण्यात आली असून बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिगावच्या पवार पाड्यात दोन्ही पीडित मुली त्यांच्या बापासोबत वास्तव्यास होत्या. आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि दोन मोठ्या बहिणींची लग्ने झाली होती. पीडित मुली जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ७ आणि इयत्ता १ ली मध्ये शिक्षण घेत आहेत. दोन वर्षांपूर्वी पीडितेच्या बापाने तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने वारंवार पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार सुरूच ठेवले होते. घडल्या प्रकाराची माहिती न सांगण्यासाठी तो जिवे मारण्याची धमकी देत होता. पीडित मुलीच्या लहान बहिणीवरही बाप लैंगिक अत्याचार करीत असल्याची माहिती लहान बहिणीने तिला दिल्याचे पीडितेने सांगितले.

श्रमजीवी संघटनेच्या रेखा धांगडे आणि प्रमिला पवार यांनी फिर्याद दाखल करण्यासाठी पीडित मुलींना मदत केली. महिला पोलिस उपनिरीक्षक एस. बी. मनवर, श्रमजीवी संघटनेच्या मीना अंभिरे आणि दक्षता समिती सदस्या आर. पी. धांगडे यांच्या उपस्थितीत फिर्याद नोंदवून घेण्यात आली. याप्रकरणी जगदीश पवार याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT