Mumbai Local Train sakal media
मुंबई

बापरे! लोकलमधील १५ लाख प्रवासी संख्या घटली, जाणून घ्या सविस्तर

कुलदीप घायवट

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना (Essential Services Employee) रेल्वे स्थानकात ओळखपत्र दाखवून( Identity Card) पास आणि तिकिट मिळते. त्याद्वारे लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, काही प्रवासी बनावट ओळखपत्र (Fake Identity card) तयार करून लोकलमधून प्रवास करताना आढळून आले. या प्रवाशांना पकडण्यासाठी कडक कारवाई केली जात आहे. तर, शेतीसाठी बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक वाढल्याने एकाच महिन्यांतच लोकलमधील प्रवासी (train traveling) संख्या 15 लाखांनी घटली आहे. (Fifteen lac travelers deduction in train one month report-nss91)

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने एप्रिल अखेरीपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंद केला. मात्र, काही प्रवाशांनी अनधिकृतरित्या बनावट ओळखपत्र तयार करून लोकल प्रवास करण्यास सुरूवात केली. बनावट ओळखपत्र घेऊन प्रवाशांना तपासण्यासाठी लोकलमध्ये फिरते पथक, रेल्वे प्रवेशद्वारावर रेल्वे पोलीस आणि स्थानकात तिकिट तपासनिसाची संख्या वाढल्याने जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. मध्य रेल्वेवर जून महिन्यात एकूण 19 लाख प्रवासी प्रवास करत होते.

मात्र, जुलै महिन्यात ही संख्या 11 लाखांवर आली आहे. तर, पश्चिम रेल्वेवर जून महिन्यात 13 लाखांवरून जुलै महिन्यात 6 लाखांवर आली आहे. दरम्यान, जून, जुलै महिन्यात चाकरमानी शेतीसाठी बाहेरगावी जातात. अनेक परप्रांतीय देखील त्यांच्या मुळगावी जाऊन शेतीची कामे हाती घेतात. तसेच राज्यातील बांधकामाची, इतर व्यवसायाची कामे आटपून अनेक कामगार बाहेरील राज्यात जाऊन कामे करतात. त्यामुळे उपनगरीय लोकलमधील प्रवाशांची संख्या कमी आहे, असे प्रवासी सूरज मौर्या याने सांगितले.

पश्चिम रेल्वेवर 21 जून रोजी प्रवासी संख्या ही 13 लाख होती. त्यानंतर जुलैच्या सुरूवातीला 9 लाखांवर आली. तर, आता 24 जुलै रोजी प्रवाशांची संख्या 6 लाख 74 हजारांवर आली आहे. पश्चिम रेल्वेने एप्रिल ते जून महिन्यात बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्या 740 जणांना पकडले. त्यांच्याकडून 3 लाखांची दंड वसूली केली. मध्य रेल्वेने एप्रिल ते जून महिन्यात एकूण 3,208 बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्यांना पकडण्यात आले आहे. यांच्याकडून 16 लाखांची दंड वसूली केली.

मध्य रेल्वेवरील घटणारी प्रवासी संख्या

7 जून 19 लाख

14 जून 18 लाख

21 जून 18 लाख

28 जून 15 लाख

5 जुलै 16 लाख

12 जुलै 13 लाख

19 जुलै 11 लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : दुष्काळसदृश परिस्थितीने सोयाबीन पिकाला फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मरडसगावात पिकांची केली पाहणी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT